Share

मुंबई इंडियन्स लागली कामाला..! पुढच्या IPL साठी आखला ‘असा’ प्लॅन; नक्की वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील खराब कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने आतापासूनच पुढील मोसमाची तयारी सुरू केली आहे. मुंबई संघ आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण न केलेल्या भारतीय खेळाडूंना जुलैमध्ये इंग्लंडमध्ये ३ आठवड्यांच्या अनुभव दौऱ्यासाठी घेऊन जाईल. विविध अत्याधुनिक केंद्रांवर प्रशिक्षणाव्यतिरिक्त, मुंबई इंडियन्सच्या युवा भारतीय खेळाडूंना अनेक काऊंटी संघांविरुद्ध किमान १० टी-२० सामने खेळण्याची संधी मिळेल. तिलक वर्मा, कुमार कार्तिकेय, रमणदीप सिंग, हृतिक शोकीन असे काही खेळाडू आहेत ज्यांना कठीण परिस्थितीत खेळण्याचा अनुभव मिळेल.

ब्रिटनमध्ये असलेला अर्जुन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा युवा क्रिकेटपटू डेवाल्ड ब्रेव्हिस यांचाही संघात समावेश होण्याची शक्यता आहे. भारतीय खेळाडूंच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा सपोर्ट स्टाफही इंग्लंडमध्ये उपस्थित राहणार आहे. मुंबईच्या संघाला गेल्या मोसमात १४ पैकी फक्त ४ सामने जिंकता आले, तर १० पराभव पत्करावे लागले. आयपीएलच्या इतिहासातील ही त्याची सर्वात खराब कामगिरी ठरली.

इंग्लंड दौऱ्यासाठी संभाव्य खेळाडू

तिलक वर्मा, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, मयंक मार्कंडे, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, अनमोलप्रीत सिंग, बेसिल थंपी, मुरुगन अश्विन, आर्यन जुयाल, आकाश मेधवाल, अर्शद खान, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस.

महत्त्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!