🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. आमिर खान या चित्रपटाचे अनोख्या आणि वेगळ्या पद्धतीने प्रमोशन करत आहे. आमिर खानचे क्रिकेट खेळतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये तो स्वतःच्या आणि चित्रपटाशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी प्रेक्षकांसोबत शेअर करत आहे. दरम्यान, त्याने एक आयपीएलसंदर्भात मागणी केली आहे. व्हिडिओमध्ये तो आयपीएल खेळण्यासाठी संधी मागताना दिसत आहे.
माजी भारतीय क्रिकेट प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आमिरच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. आमिरला त्याच्या फूटवर्कवर थोडा वेळ घालवण्याची गरज आहे, असे शास्त्रींनी म्हटले. यावर आमिर खाननेही चोख उत्तर दिले आहे. शास्त्रींच्या या उत्तरावर आमिर खान म्हणाला, “रवी, तुला माझे फूटवर्क आवडले नाही म्हणून मी जरा निराश झालो. मला वाटतं तुम्ही लगान पाहिला नाही…आता माझ्याकडे पुन्हा बघा…मला वाटतं मी ज्या टीममध्ये असेन ती प्रत्येक टीम भाग्यवान असेल…माझी चांगली शिफारस करा, मजा येईल”.
The boss has spoken! ????️#AamirKhan, What do you think of @RaviShastriOfc's analysis of your batting? ????@AKPPL_Official | @jatinsapru pic.twitter.com/uR7jrgKzgN
— Star Sports (@StarSportsIndia) May 19, 2022
आमिरचा हा व्हिडिओ एका स्पोर्ट्स चॅनलच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तो नेट्समध्ये क्रिकेट खेळताना दिसत आहे. आमिर खानने विचारले की त्याला आयपीएलच्या कोणत्याही संघातून खेळण्याची संधी मिळेल का? हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आमिर खानच्या खेळाबद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्या. अनेक युजर्सनी भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही प्रश्न विचारले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

