🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ६७वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात बंगळुरूने गुजरातचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयासह आरसीबीने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. बंगळुरूच्या या विजयाचा हिरो होता विराट कोहली. त्याने ५४ चेंडूत ७३ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. कोहलीशिवाय मॅक्सवेलने १८ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या.
मॅक्सवेलने गुजरातविरुद्ध केवळ बॅटनेच नव्हे तर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही चमत्कार केला. अशा परिस्थितीत त्याला नशिबाचीही पूर्ण साथ लाभली. तो फलंदाजीसाठी क्रिजवर आला तेव्हा पहिल्याच चेंडूवर तो बाद होण्यापासून वाचला. गुजरातसाठी राशिद खानने १५वे षटक केले. तिसऱ्या चेंडूवर त्याने कर्णधार फाफची विकेट घेतली. फाफने ४४ धावा केल्या. यानंतर चौथ्या चेंडूवर मॅक्सवेल क्रिजवर आला, हा चेंडू विकेटला स्पर्श झाला, पण बेल्स न पडल्याने मॅक्सवेल आऊट होण्यापासून वाचला. यानंतर तो सामना संपवूनच पॅव्हेलियनमध्ये परतला.
VIDEO पाहण्यासाठी येथे क्लिक करा…
असा रंगला सामना…
आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला (RCB vs GT) ८ गड्यांनी मात देत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात कप्तान हार्दिक पंड्याच्या अर्धशतकी खेळीमुळे गुजरातने बंगळुरूला १६९ धावांचे आव्हान दिले. या सामन्यात टॉस जिंकलेल्या गुजरातने प्रथम फलंदाजी स्वीकारली. प्रत्युत्तरात विराट कोहली-फाफ डु प्लेसिसच्या शतकी भागीदारीच्या जोरावर बंगळुरूने १८.४ षटकात सामना खिशात घातला. विराटने कमबॅक करत ७३ धावांची खेळी केली. बंगळुरूच्या विजयामुळे पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

