Share

“उत्तर भारतीय मतांसाठीच भाजपकडून मनसेची कुचंबना” ; काँग्रेसचं टीकास्त्र!

Published On: 

🕒 1 min read

 

मुंबई : अयोध्या दौरा हा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेतली बाब आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही अयोध्या दर्शन केले. पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचाही १० जून रोजी अयोध्या दौरा होणार आहे. आता राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केल्यामुळे चर्चेत आले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरून राज ठाकरेंवर खोचक टोला लगावला, यानंतर आता काँग्रेसनं देखील राज ठाकरेंच्या या कृतीला डिवचलं आहे, तसेच भाजपावर देखील टीका केली आहे.

राज ठाकरे यांनीं आपला अयोध्या दौरा स्थगित करण्यात असल्याचे ट्विट करून सांगितले.  राज ठाकरेंची प्रकृती बरी नसल्याने स्थगितीचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज ठाकरे यांनां खोचक टोला लगावला आहे.

आपल्या ट्वीटमधून सचिन सावंत यांनी म्हंटले आहे की, राज ठाकरे यांच्या या नामुष्कीला भाजपाच जबाबदार आहे. सुरुवातीला हवा भरण्याचे काम भाजपानेच केले.पण हिंदूत्व व्होट बँकेत वाटेकरी नको असल्यानेच औरंगाबाद सभेआधीच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने काढता पाय घेतला. उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी जाणिवपूर्वक मनसेची कुचंबणा केली.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!