Share

Sunil Raut । मोठी बातमी : पत्राचाळ प्रकरणात भाजपच्या मोहित कंबोज यांचा समावेश; सुनील राऊतांचा गंभीर आरोप

Published On: 

Sunil Raut । मुंबई : पत्रा चाळ घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने शिवसेना संजय राऊत यांना अटक केली आहे. राऊत यांच्या अटकेपासून ईडीने त्याच्या निकटवर्तीयांचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडी सध्या प्रवीण राऊत, सुजित पाटकर आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्यातील संबंधांची चौकशी करत आहे. तसेच राऊत यांना अटक झाल्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. संजय राऊतांच्या अटकेनंतर आता त्यांचे बंधू आणि शिवसेना आमदार सुनील राऊत आता चांगलेच आक्रमक झाले आहेत.

सुनील राऊत म्हणाले कि, पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊतांना खोट्या एंट्री दाखवून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर पत्राचाळ प्रकरणात सर्व मिळून ९ कंत्राटदार आहेत, यामध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांचासुद्धा सामावेश असून त्यांचीही चौकशी करायला पाहिजे पण भाजपकडून त्यांच्या चौकशीची मागणी केली जाणार नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्यावरही अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाई सुरू केली आहे. ईडी संजय राऊत आणि त्यांची पत्नी वर्षा राऊत यांची समोरासमोर चौकशी करू शकते. ईडीला संजय राऊत यांच्या घरातून काही कागदपत्रे मिळाली आहेत. या कागदपत्रांच्या आधारे ईडी राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा राऊत यांच्या खात्यावर आलेल्या एक कोटी 8 लाखांच्या संदर्भात ईडी वर्षा राऊत यांना प्रश्न विचारू शकते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!