Share

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस म्हणाल्या, गुवाहाटीला जायला मोफत बस मिळेल, ही पाटी शिंदेंच्या घराबाहेर लावा

Published On: 

महाराष्ट्र देशा डेस्क: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जितक्या प्रमाणात राजकारणात ऍक्टिव्ह असतात तितक्याच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील सोशल मीडियावर आणि मनोरंजनाच्या दुनियेत ऍक्टिव्ह असतात. त्या नेहमीच त्यांच्या परखड वक्तव्यांमुळे आणि गाण्यांमुळे चर्चेत असतात. नुकत्याच त्या झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी केलेली विधानं बरीच चर्चेत आहेत. हा भाग कालच टीव्हीवर प्रदर्शित झाला. त्यावेळी त्यांनी दिलेल्या विविध प्रश्नांची ही लोकांच्या चर्चेचा विषय बनली आहेत.

या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यांना काही ‘पुणेरी पाट्या’ दाखवण्यात आल्या आणि त्या पाट्या कुणाच्या घराबाहेर लावायला हव्यात?, असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांना आमच्या येथे गुवाहाटीला जायला मोफत बस मिळेल’ अशी ही पाटी दाखवण्यात आली. ही पाटी पाहताच त्या म्हणाल्या कि, “एकनाथजी शिंदे गुवाहाटीला जाऊन आलेले आहेत. त्यामुळे त्यांना तिकडचं सगळं काही माहित आहे. कुठे जायचं, कसं जायचं… त्यामुळे ही पाटी एकनाथजी शिंदे यांच्या घराबाहेर लावू शकतो.” त्यांचं हे उत्तर ऐकताच हास्यकल्लोळ निर्माण झाला. तर यावर सूत्रसंचालक सुबोध भावेने लगेच एक मिश्किल टिपण्णी केली. सुबोध म्हणाला, “म्हणजे आता पुण्याची पती आपल्याला थेट ठाण्यात लावली लागणार.”

पुढे त्यांना असंही विचारण्यात आलं कि, ‘देर आये दुरुस्त आये’ ही पाटी कुणाच्या कुणाच्या घराबाहेर लावू शकतो? त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, “जिनको आना था, वो तो आयेही नही। पण तरीही ही पाटी आपण दीपक केसरकर यांच्या घराबाहेर लावू शकतो.” अशा अनेक पाट्या त्यांना दाखवण्यात आल्या त्याची त्यांनी मजेशीर उत्तरं दिली. ज्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!