Share

bachchu kadu । ‘मी तर बच्चू’, मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्याइतका मोठा नाही; मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या बच्चू कडूंची माघार

Published On: 

bachchu kadu । मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लवकरच होईल. यासाठी पुढचा आठवडा वाट पहावी लागणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. आज दुपारी एक वाजता नवी दिल्लीत पोहोचले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधीपासूनच दिल्लीत आहेत. काही शासकीय कामांसाठी या दोघांचा दिल्ली दौरा असल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर यावर आता माजी मंत्री बच्चू कडू यांना याबाबत विचारले असता त्यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

मी तर अजून बच्चू आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बोलण्याइतका मोठा नाही. तो विषय हा वेगळा आहे. आम्ही तर केवळ जनतेचे सेवक आहोत. आमदार असो की मंत्री जनतेची सेवा ही महत्वाची आहे असे म्हणणारे बच्चू कडू हे यापूर्वी मंत्रिपदासाठी किती इच्छूक होते ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार हा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना याबाबत बोलणे उचित ठरणार नाही, असं म्हणत आता बच्चू कडू यांनी याबाबत सावध पवित्रा घेतला आहे.

दरम्यान, याआधी दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लवकरच होईल. यासाठी पुढचा आठवडा वाट पहावी लागणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलंय. आज दुपारी एक वाजता नवी दिल्लीत पोहोचले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधीपासूनच दिल्लीत आहेत. काही शासकीय कामांसाठी या दोघांचा दिल्ली दौरा असल्याचं सांगितलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!