🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क: सध्या चीन आणि तैवानमध्ये सुरु असलेल्या वादामुळे जग टांगणीला लागले आहे. तर यातच दुसरीकडे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातही काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर इस्रायलने शुक्रवारी गाझा पट्टीत हवाई हल्ले केले. यामध्ये पॅलेस्टिनी संघटना हमास (इस्रायल याला दहशतवादी संघटना मानते) चा वरिष्ठ कमांडर तैसिर अल-जबारी मारला गेला. हमासने सांगितले की, या हल्ल्यात गाझामधील 10 लोक मारले गेले, तर 70 हून अधिक जखमी झाले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, पॅलेस्टाईन संघटना ‘वेस्ट बँक’चा म्होरक्या बहा अबू अल-अता याला अटक करून मारण्यात आले होते. त्यामुळे त्याचेच प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. 2019 मध्ये इस्रायली सैन्याने अल-अताचा खात्मा केला होता. तर या धमकीनंतर इस्रायलने हवाई हल्ला केला आहे. त्यानंतर हमासनेही गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने 2 तासांत 100 रॉकेट डागले. यापैकी 9 गाझा पट्टीमध्ये पडले. तर पॅलेस्टाईन संघटना हमासने सांगितले, इस्रायलच्या हल्ल्यात 5 वर्षांच्या मुलीसह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे इस्रायली संरक्षण दलाने (IDF) म्हटले आहे की हवाई हल्ल्यात हमासचे किमान 15 दहशतवादी मारले गेले आहेत.
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने देशात ‘विशेष परिस्थिती’ घोषित केली आहे. देशाच्या सीमेच्या 80 किलोमीटर अंतरावरील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच सरकारी आणि इतर कार्यक्रमही रद्द करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील वाद का?
इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये किमान 100 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. वेस्ट बँक, गाझा पट्टी आणि गोलन हाइट्स या भूभागांवरून वाद सुरु आहेत. या भागांसह पूर्व जेरुसलेमवर देखील पॅलेस्टाईनने दावा केला आहे. पण इस्रायल जेरुसलेमवरील आपला दावा सोडायला तयार नाही. गाझा पट्टी हा भाग इस्रायल आणि इजिप्त यांच्यामध्ये आहे. त्यावर सध्या हमासचा ताबा आहे. हमास ही इस्रायल विरोधी संघटना आहे. सप्टेंबर 2005 मध्ये इस्रायलने गाझा पट्टीतून आपले सैन्य मागे घेतले. 2007 मध्ये इस्रायलने या भागावर अनेक निर्बंध लादले होते. तर पॅलेस्टाईनने वेस्ट बँक आणि गाझा पट्टीमध्ये स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्य स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यावरून सुरु असलेला संघर्ष आजतागायत सुरूच आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Amruta Fadnavis | अमृता फडणवीस म्हणाल्या, गुवाहाटीला जायला मोफत बस मिळेल, ही पाटी शिंदेंच्या घराबाहेर लावा
- IND vs WI 4th T20 : चौथ्या T20 सामन्यात ‘या’ खेळाडूचा पत्ता कट, ‘या’ स्टार खेळाडूला मिळेल संधी?
- Eknath Shinde । “पुढच्या आठवड्यात कशाला, लवकरच…”; मंत्रिमंडळ विस्तारावर एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य
- Rape case in Beed । धक्कादायक घटना; हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
- Ajit Pawar । लवकर करू… लवकर करू, हे सांगायचं बंद करा; मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवार संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
