Eknath Shinde ।नवी दिल्ली : सध्या राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावरून अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन बराच काळ लोटला आहे. मात्र अजूनही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, त्यामुळे विरोधकांडून एकनाथ शिंदे गट आणि सरकारवर टीका होताना दिसत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर मंत्रिमंडळाच्या मुद्द्यावरून वारंवार टीका केली आहे. यानंतर आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले कि, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लवकरच होईल. यासाठी पुढचा आठवडा वाट पहावी लागणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलंय. आज दुपारी एक वाजता नवी दिल्लीत पोहोचले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधीपासूनच दिल्लीत आहेत. काही शासकीय कामांसाठी या दोघांचा दिल्ली दौरा असल्याचं सांगितलं जात आहे.
मात्र आज आणि उद्या हे दोन्ही नेते दिल्लीत असतील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबतच्या बैठकांमध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम चर्चा होईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यानंतर सोमवारी मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा करण्यात येईल, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे दिल्लीत आज आणि उद्या होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार हे मंत्रिमंडळ विस्तारावरून वारंवार सरकारला जाब विचारत आहेत. अजित पवार म्हणाले कि, आम्ही आरोप करत नाही. वस्तुस्थिती आहे. शपथविधी होऊन 35 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेत. तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. मुखमंत्र्यांनी लवकर करू लवकर करू, हे सांगायचे बंद करावे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात बोलत होते.
महत्वाच्या बातम्या :
- Rape case in Beed । धक्कादायक घटना; हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
- Ajit Pawar । लवकर करू… लवकर करू, हे सांगायचं बंद करा; मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवार संतापले
- Aslam Sheikh | काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ, मढ मार्वे स्टुडिओ घोटाळाप्रकरणी नोटीस
- Raosaheb Danve | “आधी स्वतःच्या मुलाचं नाव ‘औरंगजेब’ ठेवा, मग…”; रावसाहेब दानवेंचा जलील यांना टोला
- Patra Chawl scam | ED संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीची समोरासमोर चौकशी करण्याची शक्यता


