🕒 1 min read
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आता एका मागोमाग एक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकताच ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक मुख्य भूमिकेत आहे. १३ मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाची सर्व महाराष्ट्रात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. आता प्रेक्षकांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
प्रसाद ओक यांनी यासंदर्भात त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “धर्मवीर आता Zee5 वर माणूस जपणे हाच ज्याच्यासाठी सर्वात मोठा धर्म, तो ‘धर्मवीर’ येतोय १७ जूनपासून थेट तुमच्या भेटीला… २०२२ चा सर्वात मोठा मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट, फक्त @ZEE5 वर!”
https://www.instagram.com/p/CesnpwqlaKo/
प्रवीण तरडेचं अभ्यासपूर्ण दिग्दर्शन आणि त्याला प्रसाद ओकची साथ यामुळे या चित्रपटाला चाहते भरभरून प्रेम देत आहेत. आजही चित्रपट अनेक थिएटर्समध्ये हाऊसफुल्ल आहे. हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
