Share

सदाभाऊंचा अर्ज मागे, विधान परिषदेच्या दहाव्या जागेसाठी चुरस वाढणार!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – नुकतीच राज्यसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अनपेक्षितपणे ३ जागा जिंकल्या. यानंतर महाविकास आघाडीमध्ये खळबळ सुरु आहे. अपक्ष आणि छोट्या मित्रपक्षांची मते फुटल्याने भाजपाला हे यश मिळाले. मात्र राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपाने आता या निवडणुकीत ५ उमेदवारांना उभे केले होते. तर सदाभाऊ खोत यांना अपक्ष म्हणून उभे केले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी – काँग्रेस आणि शिवसेना यांनी प्रत्येकी २ उमेदवार उभे केले आहेत.

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राजकीय हालचाली सुरु झाल्या होत्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हटले, “महाविकास आघाडीकडे मते जास्त आहेत. भारतीय जनता पार्टीकडे ४ निवडून येतील एवढी मते आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने केली जात आहे.” भाजपा नेते प्रविण दरेकर म्हणाले, “काँग्रेसनं त्यांचा उमेदवार मागे घ्यावा मग बिनविरोध निवडणुकीबाबत विचार केला जाईल”

सदाभाऊ खोत विधान भवनात दाखल झाले. मात्र अखेरच्या क्षणी सदाभाऊ खोत, राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे येत्या २० जूनला होणाऱ्या विधान परिषद निवडणुका होणार त्यासाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!