Share

सावळा गोंधळच..! कोरियात खेळायला गेलेला भारतीय तायक्वांदो संघ पुन्हा भारतात परतला; वाचा नक्की झालं काय!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरियामध्ये (korea) आयोजित जागतिक तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी (World Taekwondo Championships) पोहोचलेला भारतीय तायक्वांदो संघ (Indian taekwondo team) पदकांचा प्रबळ दावेदार असताना हात हलवून मायदेशी परतला. या प्रकारामुळे तायक्वांदो फेडरेशनचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. गोयांग (कोरिया) येथे २०२२च्या जागतिक तायक्वांदो पुमसे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धेत अनेक नामवंत देशांचे संघ सहभागी झाले आहेत. भारतीय खेळाडूंना अशा खेळाडूंशी टक्कर देत कोरियातील वातावरणात खेळून आपली क्षमता दाखविण्याचा अनुभव मिळाला असता.

मात्र कोरिया आणि लगतच्या देशांत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले, त्यामुळे बुस्टर डोस घेतलेल्या खेळाडूंनाच खेळण्याची परवानगी कोरियन सरकारने दिली होती आणि याचा मोठा फटका भारताच्या सर्व सहभागी २२ खेळाडूंना बसला. त्यामुळे भारतीय संघ सिंगापूरमार्गे मुंबईत परतला आहे.

भारतीय तायक्वांदो संघ (Indian taekwondo team)

संघटना म्हणून आम्ही जबाबदार नाही…

एवढ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना झालेले भारतीय तायक्वांदो खेळाडू परत येण्यास जबाबदार असलेल्या भारतीय तायक्वांदो संघटनेच्या अध्यक्षांनी बुस्टर डोस घेणे प्रत्येक खेळाडूची वैयक्तिक जबाबदारी होती, संघटनेची नाही, असे सांगत हात झटकले आहेत. कोरियातील सरकारने स्पर्धेत सहभागी संघांना क्लारंटाइन केले होते, भारतात बुस्टर डोस १९० दिवसांनंतर घेतला जातो, स्पर्धेत प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना तो देण्यासाठी विशेष परवानगी मागितली होती, मात्र डोसच्या कालावधीचे गणित जुळले नाही.

खेळाडू स्वखर्चाने रवाना..

”कोरियातील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झालेले भारतीय तायक्वांदो खेळाडू स्वखर्चाने सहभागी झाले होते, महासंघाला नव्याने अनुदान मिळाले नाही, लवकरच संघटना बैठक बोलावून खेळाडूंसाठी काही तरी मार्ग काढेल. कोरिया सरकारने लागू केलेल्या नियमांत आपले खेळाडू बसत नसल्याने त्यांना माघारी परतावे लागले याची संघटनेस खंत आहे, औरंगाबाद येथील निवड चाचणीतून जाहीर झालेल्या तायक्वांदोपटूंकडून दर्जेदार कामगिरीची अपेक्षा होती”, असे शिरगावकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!