🕒 1 min read
मुंबई : भाजप आमदार गणेश नाईक यांनी रिव्हॉल्वर दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करणाऱ्या महिलेने त्यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केल्याने मोठी खळबळ माजली आहे. नेरूळ पोलिस ठाण्यात गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे नवी मुंबई पोलिसांकडून भाजप आमदार गणेश नाईकांचा शोध सुरु आहे.
कोपरखैरणेमधलं घर, कार्यालय आणि मुरबाडमधल्या फार्महाऊसवर पोलिसांचं पथक गणेश नाईकांचा शोध घेणार आहेत. गणेश नाईकांवर एका महिलेनं बलात्काराचे आरोप केले आहेत. दीपा चौहान असं या महिलेचं नाव असून त्यांनी यासंबंधित महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.
नेमके प्रकरण काय?
१९९३ साली तक्रारदार महिला वाशी सेक्टर-१७ मधील बिग फ्लॅश स्पोर्ट्स क्लब येथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. यावेळी गणेश नाईक क्लबमध्ये बैठकीसाठी जात असत. ओळख झाल्यानंतर ते मला संपर्क करीत होते. १९९५पासून आमच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यावेळी नाईक मला पारसिक हिल येथील बंगल्यावर घेऊन गेले. आणि त्यांनी शरीरसंबंध प्रस्थापित केले. पुण्यातही आमच्यामध्ये संमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाले. असे तक्रारदार महिलेने म्हटले आहे.
त्यानंतर नोव्हेंबर २००६ मध्ये गणेश नाईक यांच्यापासून गर्भवती राहिल्यानंतर न्यू जर्सी येथे १८ ऑगस्ट २००७ मध्ये या महिलेने मुलाला जन्म दिला. त्यानंतर त्यांनी नेरूळमधील सीब्रीज टॉवर इमारतीत या महिलेला राहण्यास नेले. ते आठवड्यातून तीन वेळा घरी येत असत. त्यावेळी त्यांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून लैंगिक शोषण केले, अशी तक्रार या महिलेने केली आहे. दरम्यान या आरोपामुळे आमदार गणेश नाईक यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
