Share

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण : ११५ ST कर्मचाऱ्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली होती. महिला आंदोलकांनी बांगड्या फोडत पवार कुटुंबियांविरोधात जोरदार हल्लाबोल चढवला होता. या हल्ला प्रकरणी अटक होऊन न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११५ एसटी कर्मचाऱ्यांच्या जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयाचे आता दरवाजे ठोठावले आहेत.

यामध्ये 24 महिलांचा समावेश असून या सर्व आंदोलकांना, आर्थर रोड, तळोजा, भायखळा अश्या विविध कारागृहात जागेच्या उपलब्धतेनुसार ठेवण्यात आले आहे. या सर्वांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. यापैकी बरेच जण हे मुंबई बाहेरून आले आहेत, त्यांच्यापैकी अनेकांकडे जामीनाची अनामत रक्कम भरण्यासाठीही पैसे नाहीत अशी बिकट अवस्था असल्याचे त्यांच्या जामीन अर्जात नमूद केलेलं आहे.

29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश –

या आंदोलनप्रकरणी येत्या 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणात तपास सुरू आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देऊ नये, अशी भूमिका घेत राज्य सरकारच्यावतीने जयश्री पाटील यांच्या याचिकेला राज्य सरकारनं जोरदार विरोध केला होता. पण एफआयआरमध्ये त्यांचं अद्याप नाव टाकलेलं नाही. तिसऱ्या रीमांडला पाटील यांच्या सहभागाचा उल्लेख झाला तसेच एफआयआर क्रमांकांमध्ये काही तांत्रिक दोष असल्याच्या मुद्यावर कोर्टानं त्यांना अंतरिम दिलासा मंजूर केला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!