मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंडचा यशस्वी दौरा पूर्ण झाल्यानंतर आता संघ वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. शुक्रवारी टीम इंडियाला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळायचा आहे. वेस्ट इंडीज विरुद्ध च्या पहिल्या एक दिवशीय सामन्यावर पावसाचे संकट दिसत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला इनडोअर सराव करावा लागला आहे. बीसीसीआयने व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत वरिष्ठ खेळाडूंशिवाय खेळणार आहे. संघाची कमान अनुभवी सलामीवीर शिखर धवनकडे असणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या यांना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेतील सर्व सामने पोर्ट ऑफ स्पेन येथे होणार आहेत. मात्र या ठिकाणी सध्या पावसाळा सुरू आहे.
बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघ पावसामुळे मोकळ्या मैदानाऐवजी इनडोअर सराव करताना दिसत आहे. ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, अर्शदीप सिंग पहिल्या नेट सेशनसाठी वार्मअप करताना दिसत आहेत. कर्णधार शिखर धवनही सरावासाठी त्याची किट तयार करत आहे. या व्हिडिओत बाहेर पाऊस पडत असल्याचे दिसत आहे.
Gearing up for ODI No.1 against the West Indies ????
Here's @ShubmanGill giving a lowdown on #TeamIndia's ???????? first net session in Trinidad ????????#WIvIND pic.twitter.com/oxF0dHJfOI
— BCCI (@BCCI) July 21, 2022
वेस्ट इंडीज विरुद्ध एकदिवसीय संघ
भारत : शिखर धवन (कर्णधार) ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध्द कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना – २२ जुलै – पोर्ट ऑफ स्पेन
दुसरा एकदिवसीय सामना – २४ जुलै – पोर्ट ऑफ स्पेन
तिसरा एकदिवसीय सामना – २७ जुलै – पोर्ट ऑफ स्पेन
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde VS Uddhav Thackeray | एकनाथ शिंदेंचा डोळा 188 नेत्यांवर, उद्धव ठाकरेंची संपूर्ण शिवसेना हायजॅक करण्याची तयारी
- County Cricket : चेतेश्वर पुजाराच्या द्विशतकावर इंग्लंड फिदा, केलं भव्य स्वागत; पाहा VIDEO!
- Raj Thakrey : राज ठाकरेंची विचारपूस करण्यासाठी गायिका आशाताई ‘शिवतीर्थ’ वर
- Vijay devarkonda | विजय देवरकोंडाच्या ‘लिगर’कडून चाहत्यांना आहे ‘ही’ अपेक्षा; लवकरच होणार रिलीज
- Rupali Patil : चित्रा वाघ यांचं डोके ठिकाणावर आहे का ?; रुपाली पाटलांचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

