🕒 1 min read
Rupali Patil । मुंबई : मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात घालून खुर्चीवर बसल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ ट्विट करत टोला लगावला आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत चित्र वाघ यांचा जोरदार समाचार घेतला आहे.
काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे पाटील
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या खाजगी आयुष्याचे व्हिडीओ भाजपच्या नेत्या चित्रा वाघ कसा काय सोशल मीडियावर पोस्ट करू शकतात. फक्त नाना पटोले नाही तर कोणाचेच असे व्हिडीओ टाकू शकत नाही. तो व्हिडीओ खरा कि खोटा हे ही माहीत नाही. तसेच अशा असतात का संवेदशील, जबाबदार महिला नेत्या, चित्रा ताई वाघ यांचं डोके ठिकाणावर आहे का ? त्या महिलेची तक्रार नाही, तिने स्वतः तो पोस्ट केला नाही, मग तुमचा जीव कशामुळे तुटतोय ते तरी स्पष्ट करा ताई. चित्रा ताई तुम्हाला हे वागणे शोभत नाही. खरा अन्याय झालेल्या महिलेला न्याय देणे आणि स्वतः घाणेरडे राजकारणासाठी इंटेशनली प्रकरण उभे करणे यामध्ये फार मोठा फरक आहे. चित्रा ताई महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, सक्षमीकरण अनेक अडचणी आहेत त्या सोडवा. कोणाच्या खाजगी आयुष्यात डोकवा डोकवी करू नका. यावरून तुमच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो, असं म्हणत त्यांनी वाघ यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
https://www.facebook.com/Rupalispeak/posts/pfbid05GEcpJHi3ubmQR5RxxGVD4wdRw82Ym9uU59feKCvJFgoaTuVLMAFFxYYvjZE2PYFl
काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून हा व्हिडीओ शेअर करत नाना पटोले यांना, ‘काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं’ असा प्रश्न विचारला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करत हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर एक पत्रकार परिषद देखील घेतली. नाना पटोले यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याने लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी याबाबत समोर येऊन भूमिका मांडावी असे चित्रा वाघ म्हणाल्या.
काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं….????????@NANA_PATOLE @INCIndia @MumbaiPMC @INCMumbai pic.twitter.com/7GnKQ2t6jW
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 20, 2022
दरम्यान, नाना पटोले यांना विचारपूस केली असता त्यांनी हे भाजपाचे कट कारस्थान असल्याचा आरोप नाना पाटोले यांनी केला आहे. त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे नाना पटोले यांनी केला आहे. यावर कायदेशीर बाबी आमची लीगल टीम तपासत आहे, असे नाना पटोले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Sushmita Sen | सुष्मिता सेनच्या चष्म्यातून दिसल्या दारूच्या बाटल्या; नेटिझन्सचे केले टार्गेट
- IND vs WI : बीसीसीआयने खेळाडूंसाठी चार्टर्ड फ्लाइटवर खर्च केले ‘इतके’ कोटी रुपये; वाचा!
- Aditya Thackeray : “गद्दार ते गद्दारच, त्यांच्या माथ्यावरून गद्दारीचा शिक्का…”; आदित्य ठाकरे आक्रमक
- Nana Patole : ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर नाना पटोले यांची प्रतिक्रिया!
- Former Shiv Sena MP | “गद्दार आमदार, खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही” ; शिवसेनेच्या माजी खासदाराचा गंभीर इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
