Share

County Cricket : चेतेश्वर पुजाराच्या द्विशतकावर इंग्लंड फिदा, केलं भव्य स्वागत; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंडमध्ये सध्या काऊंटी क्रिकेट खेळले जात आहे. या स्पर्धेत भारताचे अनेक खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने बुधवारी लाड्स येथे इतिहास रचला. ससेक्सकडून खेळताना त्याने मोसमातील तिसरे द्विशतक झळकावले आहे. पुजारा या सामन्यात ससेक्स संघाचे नेतृत्व करत आहे. पहिल्या डावात त्याने संघासाठी द्विशतकीय खेळी करत संघाची धावसंख्या ५२३ धावांवर नेली. पुजाराच्या या शानदार खेळीनंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर सामना पाहण्यासाठी आलेल्या सर्वांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले.

ससेक्सचा कर्णधार म्हणून काऊंटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या पुजाराने शानदार खेळी केली. त्याने भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेपूर्वी जिथे खेळ सोडला होता तेथूनच पुन्हा सुरुवात केली. सामन्याच्या पहिल्या दिवशी या भारतीय फलंदाजाने शतक झळकावून संघाला मजबूत केले होते. तर दुसऱ्या दिवशी द्विशतक झळकावत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ससेक्सने ४ बाद ३२८ धावांवर खेळण्यास सुरुवात केली. पुजाराने ३६८ चेंडूत १९ आणि २ षटकार मारत द्विशतक पूर्ण केले. पुजारा ससेक्ससाठी बाद झालेला शेवटचा फलंदाज ठरला. त्याने ४०३ चेंडूंचा सामना करत २१ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २३१ धावा केल्या. द्विशतक झळकावल्यानंतर तो परतला तेव्हा उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले.

https://www.instagram.com/p/CgPUS17IY-8/?igshid=YmMyMTA2M2Y=

पुजाराने ११८ वर्षांचा इतिहास बदलला

बुधवारी ससेक्स संघाकडून खेळताना पुजाराने या मोसमातील तिसरे द्विशतक झळकावले. या मोसमात आतापर्यंत त्याने ५ शतकी खेळींच्या मदतीने एकूण ९९७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी १२४ च्या वर राहिली आहे. एकाच मोसमात तीन द्विशतके झळकावणारा पुजारा ११८ वर्षांतील ससेक्सचा पहिला फलंदाज ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!