मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने २-१ ने बाजी मारली. या मालिकेत आक्रमक भूमिका घेतल्याने भारताला फायदा झाला आहे. आता भारतीय संघाचे लक्ष्य ३ सामन्यांच्या वनडे मालिकेवर असणार आहे. संघाने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली पाहिजे आणि एकदिवसीय मालिकेतही संघ उत्तम कामगिरी करेल, असे मत भारतीय कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले आहे. इंग्लंडने गेल्या काही वर्षांत आपल्या आक्रमक खेळाने एकदिवसीय क्रिकेट खेळण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली आहे. त्याचा फायदा संघाला २०१९ च्या विश्वचषक विजेतेपदासह मिळाला होता. टी-२० फॉरमॅटमध्ये भारताचा दृष्टिकोन इंग्लंडपासून बदलला आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
इंग्लंड दौऱ्यातील ही एकदिवसीय मलिका शिखर धवनसारख्या खेळाडूसाठी महत्त्वाची ठरेल. कारण तो केवळ एकदिवसीय स्वरुपात भारताचे प्रतिनिधित्व करतो. त्याचबरोबर त्याला आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यावर संघाचे नेतृत्व करायचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मर्यादित संधी मिळूनही शिखर धवनने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. धवन एकदिवसीय किंवा आयपीएल खेळताना त्याच्या बॅटमधून सतत धावा निघाल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय चाहते विराट कोहलीच्या लयीत परतण्याची वाट पाहत आहेत. या दौऱ्यावर कसोटी आणि टी-२० मध्ये त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. त्यामुळे या एकदिवसीय मालिकेत चाहत्यांना विराट कडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही संघांचे संभाव्य खेळाडू
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र सिंग चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिध्द कृष्णा, मुहम्मद शमी, मुहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, हॅटरी ब्रुक(यष्टिरक्षक), ब्रायडन कार्स, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, क्रेग ओव्हरटन, मॅथ्यू पार्किन्सन, जो रूट, जेसन रॉय, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोप्ली, डेव्हिड विली.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

