मुंबई : सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ सगळीकडे जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे निसर्गाचं एक अनोख रूप खुलून आलं होत. पाऊस सुरु होताच आंबोली घाटात पर्यटकांची मोठी गर्दी होण्यास सुरवात झाली आहे. सध्या पावसाचं वातावरण आहे, सगळीकडे हिरवळ पसरली आहे. लोक घरातून बाहेर पडून पावसाचा आंनद घेत आहेत.
पावसाच्या या रमणीय वातावरणावरून प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे मग ती वेळ कोणतीही असो. असाच फिरायला गेलेल्या तरूणांच्या झिंगाट डान्सचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणांचा एक घोळका चक्क रस्त्यावर नाचताना दिसत आहे. एका ट्रकच्या हॉर्नच्या आवाजावर झिंगाट होऊन तरुणांचा हा घोळका नाचताना दिसत आहेत.
या तरुणाच्या घोळक्यामधील काही तरुण नागीन डान्स करत आहेत तर काहीजण रस्त्यावर लोळून नाचत आहेत. तर काही तरुण मोर डान्स करत आहेत. घाट रस्त्यावरील एका मालवाहू गाडीच्या हॉर्नच्या आवाजावर ते नाचत आहेत पण भर रस्तात अशा प्रकारचं धाडस करण धोक्याचं ठरू शकतं. तसाच हा सर्व प्रकार आंबोली घाटातील आहे. मात्र तरुणांच्या या सर्व प्रकारामुळे घाटातील बाकी पर्यटकांना त्रास सहन करावा लागला होता.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

