Share

Sanjay Raut : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत संजय राऊतांच मोठं वक्तव्य, म्हणाले…

Published On: 

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी आज मातोश्रीवर पक्षातील खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत पक्षातील इतर खासदारांची संजय राऊत यांच्याविरुद्ध खडाजंगी झाल्याचे समोर आले. कारण या बैठकीत शिवसेना पक्षाच्या खासदारांकडून एनडीएच्या राष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्याची मागणी झाली होती. तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यूपीएचे राष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. यावरून बैठकीत गदारोळ झाल्याचे समोर आले होते. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष घेईल तो निर्णय मला मान्य आहे, मी कसल्याही प्रकारे नाराज नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता शिवसेना द्रौपदी मुर्मु यांनाच पाठिंबा देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी खासदारांनी कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे पक्षप्रमुखाला देण्यात आला आहे. आज झालेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवरही चर्चा झाली. तसेच शिवसेनेने राजकारणाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत राहील. पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्या निर्णयालाच सर्व खासदारांचा पाठिंबा राहील. याबाबत माझ्यात कोणतीही नाराजी नसल्याचे यावेळी संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

आज झालेल्या मातोश्रीवरील खासदारांच्या बैठकीत गैरहजर राहिलेले खासदार शिंदे गटात जाण्याच्या चर्चा होत आहेत. खासदार शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चा समोर येत आहेत त्यावरती ही विश्वास ठेवू नका. शिवसेनेतील फक्त श्रीकांत शिंदे व भावना गवळी हेच गैरहजर का राहिले त्याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र इतर गैरहजर असलेल्या खासदारांनी याबाबत पूर्व कल्पना दिली होती. असेही यावेळी संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांचा आणि बाळासाहेब यांचाच आहे. शिवसेनेला असे कोणी बळकावू शकत नाही. त्यामुळे पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तोच सर्वांसाठी लागू होतो. पक्षात कोणाला ठेवायचे कोणाला पदावरून हटवायचे याचाही पूर्णपणे अधिकार पक्षप्रमुखांकडे आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे आमचे गुरु आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच आमची वाटचाल सुरू आहे. त्यांच्यानंतर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमच्या गुरु समान आहेत. त्यामुळे त्यांचा जो आदेश असेल तोच आम्हाला मान्य असेल. असेही राऊत यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!