महाराष्ट्र देशा डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता अक्षय कुमार, जेष्ठ अभिनेते रजनीकांत असे अनेक दिग्गज आपल्याला मॅन व्हर्सेस वाइल्ड या कार्यक्रमात पाहायला मिळाले. यातच आता बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग देखील नेटफ्लिक्सच्या ‘रणवीर व्हर्सेस वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’ या थरारक कार्यक्रमात दिसला. या भागाला सध्या जगभरातील नेटकऱ्यांकडून पसंती मिळत आहे.
यावेळचा अनुभव सांगताना रणवीर म्हणाला, ” होय, मला वैयक्तिकदृष्ट्या खूप छान वाटले. हा माझ्यासाठी एक अनोखा प्रयोग होता मात्र तो यशस्वी होईल की नाही याबद्दल मला खात्री नव्हती. पण खरे सांगायचे तर कार्यक्रमाच्या निर्मात्यांना माझ्यापेक्षा जास्त आत्मविश्वास होता. जेव्हा आम्ही त्या ठिकाणी पोहचलो आणि शोचे शूटिंग पूर्ण केले तेव्हा खूप छान वाटले. तसेच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, हे पाहून मला खूप आनंद होत आहे”.
या कार्यक्रमाचा प्रस्ताव आल्यावर तुझी प्रतिक्रिया काय होती, या प्रश्नाचे उत्तर देताना रणवीर म्हणाला, “जेव्हा मला शो बद्दल विचारण्यात आले, तेव्हा मी खूप उत्सुक होतो. जे यापूर्वी कधीही केले नव्हते ते करण्याची संधी मिळणार होती. माझ्या जीवनात अनेक वेळा मी जोखीम घेण्यासाठी उत्सुक असतो. हि देखील तशीच एक जोखीम होती आणि ही अत्यंत रोमांचकारी देखील होती”.
बेअर ग्रिल्ससोबत काम करण्याचा त्याचा अनुभव सांगताना रणवीर म्हणाला, “आधी मला वाटले होते कि जंगलात जाणे खूप छान असेल, जे मी यापूर्वी कधीही केले नव्हते. मात्र या प्रवासात जंगलाचा राजा असलेले बेअर ग्रिल्स माझ्या सोबत होते याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. ते या सर्व्हायव्हल गेमचे मास्टर आहेत. त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. मी हा शो केला नसता तर मला हा अनुभव घेताच आला नसता”.
महत्वाच्या बातम्या:


