🕒 1 min read
मुंबई : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टी-२० विश्वचषक २०२२ (T20 World Cup) मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पाकिस्तानी संघ भारतीय संघाला सहज पराभूत करू शकणार नसून त्यांना अतिशय खडतर आव्हान मिळेल, असे त्याने म्हटले आहे.
यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा १० विकेट्सने सहज पराभव केला. विश्वचषकात भारतीय संघाविरुद्ध पाकिस्तानचा हा पहिलाच विजय ठरला. यापूर्वी विश्वचषकात पाकिस्तानला भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
टी-२० विश्वचषकात हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २३ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. मात्र, यावेळी टीम इंडिया पाकिस्तानला कडवे आव्हान देईल, असा विश्वास माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केला आहे. याशिवाय त्याने पाकिस्तानला दुसऱ्या डावात गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला.
शोएब अख्तर म्हणाला, ”यावेळी भारतीय संघ पूर्ण नियोजनासह येईल. यावेळी भारताला पराभूत करणे पाकिस्तानसाठी सोपे नसेल. सामन्याच्या निकालाचा आत्ताच अंदाज बांधणे कठीण असले तरी पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करावी आणि नंतर गोलंदाजी करावी, असे माझे मत आहे. याचे कारण मेलबर्नमध्ये वेगवान गोलंदाजांना भरपूर उसळी मिळते. माझ्या मते यावेळी आणखी लोक मैदानात येतील. मेलबर्नमध्ये जवळपास १.५ लाख लोक सामना पाहण्यासाठी येतील, त्यापैकी सुमारे ७० हजार भारतीय असतील.”
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
