Share

“मोदींमुळेच भारत आज जगाच्या मुख्य प्रवाहात” ; फडणवीसांचे प्रतिपादन

Published On: 

मुंबई :  मुंबईमध्ये आज भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीची बैठकीत पार पडली. या बैठकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर आपले मत मांडले. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ३१ मे ला आठ वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले की, “भारत आज जगाच्या मुख्य प्रवाहात आहे. हे यश आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्वाचे आहे आपल्याला उत्सव नाही, तर संवाद करायचा आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी लाभार्थी संवाद मेळावे करायचे आहेत. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, इतकंच नाही तर प्रत्येक व्यक्तीला आपले मानत त्यांनी सुशासनाचा आदर्श उभा केला. आज जगातील अनेक देश महागाईने त्रस्त असताना त्यावर उपाययोजना करणारा भारत हा देश आहे.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ३१ मे रोजी ८ वर्ष पूर्ण होत आहेत. हे सेवेचे पर्व आहे. सुशासनाचे पर्व आहे, हे गरीब कल्याणाचे पर्व आहे. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण यावरून महाविकास आघाडीवरही जोरदार टीका केली. “आम्ही यापूर्वीही सांगितलं आहे आणि आम्ही वारंवार म्हणतो की, ओबीसी आरक्षण घालविणे हे महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. ओबीसी आरक्षण रद्द करणे हे राज्य सरकारमधील कुणाचे तरी षडयंत्र आहे. यांनी ओबीसी आरक्षणाची हत्या केली आहे. याला संपूर्णपणे जबाबदार फक्त महाविकास आघाडी आहे.” ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!