🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये आज पहिला क्वालिफायर सामना (Qualifier 1) गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात होणार आहे. गुजरात टायटन्सचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतियाने या सामन्यापूर्वी जोस बटलरबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बटलरने या आयपीएल मोसमात सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकावी, पण गुजरातविरुद्ध तो फ्लॉप ठरावा, असे मत तेवतियाने दिले आहे.
आज विजेता ठरणारा संघ थेट अंतिम फेरीत जाईल. गुजरात टायटन्स संघाला सर्वात मोठा धोका जोस बटलरकडून आहे, जो या आयपीएल हंगामात अतिशय धोकादायक फॉर्ममध्ये आहे. गेल्या काही सामन्यांपासून बटलरची बॅट शांत असली, तरी तो राजस्थान रॉयल्सला एकहाती विजय मिळवून देऊ शकतो. त्यामुळेच बटलरला आपल्या संघाने लवकरात लवकर बाद करावे, अशी राहुल तेवतियाची इच्छा आहे.
Crossing over to Gujarat from Rajasthan, these Titans know the opposition pretty well ????
No trade secrets in this ????, but lots of reminiscing and excitement before #GTvRR ????@DavidMillerSA12 @VarunAaron@rahultewatia02 #SeasonOfFirsts #AavaDe pic.twitter.com/UAjVrDuMNG
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 23, 2022
या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी गुजरात टायटन्सने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलर यांनी जोस बटलरवर प्रतिक्रिया दिली. तेवातिया म्हणाला, “बटलर मैदानाबाहेर जितका आक्रमक असतो तितकाच तो मैदानाबाहेर शांत असतो. त्याने ऑरेंज कॅप कायम ठेवावी पण आमच्याविरुद्ध धावा करू नयेत, अशी माझी इच्छा आहे.”
याआधी राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलर हे देखील राजस्थान रॉयल्स संघाचा भाग राहिले आहेत. त्यामुळे ते जोस बटलरला चांगलेच ओळखतात. जोस बटलर किती धोकादायक आहे हे या खेळाडूंना चांगलेच माहीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
