मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष वाढत असताना पाहायला मिळत आहेत. खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपाचे नेते किरीट सोमय्या वारंवार टीका करताना दिसून येत आहेत.
किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी काल संजय राऊतांविरोधात उच्च न्यायालयात १०० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यावर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.