मुंबई : आज मनसेने (मंगळवार) ब्रिजभूषण शरण सिंह आणि शरद पवार यांचे साडेतीन वर्षे जुने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबत ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाला खत-पाणी देण्याचे काम राष्ट्रवादी करत असल्याचा आरोपही करण्यात आला. मनसेचे नेते गजानन काळे यांनी याबाबत ट्विट केले आहे.
शरद पवारांवर रसद पुरवल्याचा आरोप झाल्यानंतर रोहित पवारांनी मनसेवर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले, “राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय तरी मनसेला हे कसं कळत नसेल? खासदार ब्रिजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये.”
मनसेने राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया
“राहिला प्रश्न शरद पवार साहेब आणि ब्रिजभूषण सिंह यांच्या एकत्रित फोटोचा, तर शरद पवार हे अनेक वर्षे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि ब्रिजभूषण सिंह हे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत. मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळं संभाव्य अपघात टळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल”, असा खोचक टोला रोहित पवारांनी मनसेला लगावला आहे.
https://www.facebook.com/RRPspeaks/posts/567604854721649
महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा राज ठाकरेंनी केला होता आरोप
राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले होते. पण अयोध्या दौऱ्याच्या १५ दिवस आधी २० मे रोजी राज ठाकरे यांनी ट्विट करून आपली अयोध्या भेट तूर्तास पुढे ढकलली आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलल्यानंतर अनेक प्रकारच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 22 मे रोजी पुण्यातील एका जाहीर सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी दावा केला की, भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी अयोध्या भेटीची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी विरोध सुरू केला. यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. मात्र रसद कुणी पुरवली हे राज ठाकरेंनी सांगितले नव्हते.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

