मुंबई : आयपीएल २०२२ हंगाम संपल्यानंतर भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात पूर्वनियोजित एक कसोटी सामना जुलै महिन्यात खेळला जाणार आहे. या खेळल्या जाणाऱ्या एकमेव कसोटीसाठी चेतेश्वर पुजाराचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. पुजारा बऱ्याच काळापासून खराब फॉर्ममध्ये होता. त्यामुळे भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेमधून त्याला वळगण्यात आले होते. त्यानंतर इंग्लिश काऊंटी क्रिकेटमधील दमदार कामगिरीनंतर पुजाराचा पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघामध्ये समावेश करण्यात आला आहे.
‘मी आयपीएलमध्ये असतो तर मला मॅच खेळायला मिळण्याची शक्यता कमी होती. मी फक्त नेट्समध्ये गेलो असतो आणि प्रॅक्टीस करून परतलो असतो. सामन्यांत फलंदाजी करणे आणि नेट प्रॅक्टीस करणे यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे मला कांऊटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी आली त्यावेळी मी तातडीनं त्याला होकार दिला. माझ्यासाठी फलंदाजीमध्ये लय प्राप्त करणे आवश्यक होते.
Cheteshwar Pujara said, "had I been picked by an IPL team, mostly I wouldn’t have got any games. I would've just gone for net practice. The major reason I said yes to the county stint is that I wanted my old rhythm back". (To Indian Express).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 23, 2022
IPL auction snub a blessing in disguise for Cheteshwar Pujara#CheteshwarPujara #IPL2022 #INDvENG #CricketTwitter pic.twitter.com/5fMsjpU2RC
— Behind Cricket (@behindCric8) May 23, 2022
मागील आयपीएल हंगामात चेतेश्वर पुजारा चेन्नई सुपर किंग्स संघाचा सदस्य होता. यावर्षी झालेल्या आयपीएल लिलावामध्ये त्याला कुणीही खरेदी केले नाही. त्यानंतर त्यानं इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला तो भलताच फायदेशीर ठरला. कसोटी संघामध्ये निवड झाल्यानंतर पुजारानं आयपीएलबाबत मत व्यक्त केलं आहे.
काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये ससेक्स संघाकडून खेळताना चेतेश्वर पुजाराने ७ डावांमध्ये त्याने १४३.४ च्या सरासरीने ७१७ धावा केल्या, यात त्याच्या नावावर दोन द्विशतकं आणि ४ शतकं होती. १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना होणार आहे. मागच्या वर्षी पुर्ण न झालेल्या मालिकेचा हा अखेरचा सामना आहे. कोरोनामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातली शेवटचा कसोटी सामना स्थगित करण्यात आला होता. या मालिकेमध्ये टीम इंडिया २-१ ने आघाडीवर आहे.
महत्वाच्या बतम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

