मुंबई : भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना काल खेळला गेला. हा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर झाला. सामन्यात भारताला विजयासाठी ३१२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने २ गडी राखून विजय मिळवला. भारताकडून अक्षर पटेलने ६४ धावांची नाबाद खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.
या विजयासह टीम इंडियाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेत मालिका जिंकली आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्टइंडीजच्या भूमीवर प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकली आहे. त्याचबरोबर भारतीय संघाने सलग एकदिवसीय मालिका जिंकण्यात विश्वविक्रम रचला आहे. याबाबतीत भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे.
यापूर्वी भारतीय संघ या विक्रमाच्या खास यादीत पाकिस्तानसह संयुक्तपणे अव्वलस्थानी होता. पाकिस्तानने १९९६ ते २०२१ पर्यंत झिम्बाब्वेविरुद्ध सलग ११ वनडे मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. परंतु आता भारतीय संघाने पाकिस्तानला मागे सोडत हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. भारताने वेस्टइंडीज विरुद्ध सलग १२ एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. भारताने या संघाविरुद्ध २००७ पासून एकही एकदिवसीय मालिका गमावलेली नाही. तर पाकिस्तान संघाने १९९६ पासून झिंबाब्वे संघाविरुद्ध सलग ११ एकदिवसीय मालिकांमध्ये विजय मिळवला आहे.
काल खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्टइंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम खेळताना यजमानांनी शाई होपचे शतक आणि कर्णधार निकोस पूरनच्या अर्धशतकाच्या जोरावर ५० षटकांत ७ बाद ३११ धावा केल्या होत्या. भारताला विजयासाठी ३१२ धावांचे लक्ष्य मिळाले होते.
दुसऱ्या डावात भारताकडून श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांनी शानदार अर्धशतके झळकावली. शेवटी अक्षर पटेलच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ४९.४ षटकात ८ विकेट गमावत ३१२ धावा करत सामना जिंकला. सामन्यातील अक्षर पटेलला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी ‘सामनावीर’ चा किताब देण्यात आला.
.@akshar2026 played a sensational knock & bagged the Player of the Match award as #TeamIndia beat West Indies in the 2nd ODI to take an unassailable lead in the series. ???? ???? #WIvIND
Scorecard▶️ https://t.co/EbX5JUciYM pic.twitter.com/4U9Ugah7vL
— BCCI (@BCCI) July 24, 2022
महत्वाच्या बातम्या :
- Paymate B2B ग्राहकांना व्हिसा कमर्शियल क्रेडिट कार्डद्वारे सुविधा देयके भरणे शक्य
- Anil Desai : धनुष्यबाण मिळविण्याच्या लढाईत आता अनिल देसाईंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
- Uddhav Thackeray : “भाजपाला एक तर शिवसेना संपवायचीय आणि ती संपवताना त्यांना ठाकरे…” ; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
- Abdul Sattar : “… तर मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवायला तयार”, अब्दुल सत्तारांच ठाकरेंना आव्हान
- Uddhav Thackeray : बंडखोरांनी आपल्या आईवडिलांना सोबत घेऊन मत मागवीत, पण हे माझे वडीलही चोरायला निघालेत – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

