मुंबई: राज्यात सध्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलेच रंगू लागले आहे. भाजपकडून सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक यांना संधी देण्यात आली आहे. त्यात मत फुटू नये, यासाठी सर्वच पक्षांकडून काळजी घेण्यात येत आहे. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली असून यानंतर त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादी नेते क्लाईड क्रास्टो यांनी त्यांना टोला लगावला आहे.
“आशिष शेलार जी, तुम्हाला राज्यसभा निवडणुकीसाठी ‘C’ टीम मत देणार असल्याचे तुम्ही जाहीर केलेत. आता ‘B’ टीम पण मत देणार का हे देखील जाहीर करून टाका, जेणेकरून लोकांचा संभ्रम दूर होईल आणि दोन्ही टीम भाजपच्याच असल्याबद्दल कोणाच्याच मनात शंका उरणार नाही.”, असा टोला क्लाईड क्रास्टो यांनी लगावला आहे.
आशिष शेलार जी, तुम्हाला राज्यसभा निवडणुकीसाठी 'C' टीम मत देणार असल्याचे तुम्ही जाहीर केलेत.
आता 'B' टीम पण मत देणार का हे देखील जाहीर करून टाका, जेणेकरून लोकांचा संभ्रम दूर होईल आणि दोन्ही टीम भाजपच्याच असल्याबद्दल कोणाच्याच मनात शंका उरणार नाही.#BJP #MNS #AIMIM @ShelarAshish— Clyde Crasto – क्लाईड क्रास्टो ???????? (@Clyde_Crasto) June 8, 2022
“येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मनसेचे मत भाजपाला मिळावे म्हणून मी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना विनंती केली आहे. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या आमदारांना सांगितले आहे. त्यामुळे आमचा विजय आणखी सोपा होणार आहे.”, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.
महत्वाच्या बातम्या:
- इम्तियाज जलील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; ‘या’ पंधरा मुद्द्यांवर भाषणात बोलण्याची केली मागणी
- महिला क्रिकेट जगतावर ‘राज’ करणाऱ्या ‘मिताली’चा क्रिकेटला रामराम; वाचा!
- “सभेपूर्वी उद्धव ठाकरेंनी औरंगाबादसाठी निधी मंजूर केला” ; रावसाहेब दानवेंचा आरोप
- “उत्तरप्रदेशच्या शाळांमध्ये मराठी शिकवा, महाराष्ट्रात नोकऱ्या मिळतील”; भाजप नेते कृपाशंकर सिंग
- “भाजपने शब्द पाळला नाही, अन्याय केला” ; विनायक मेटेंची प्रतिक्रिया


