मुंबई : प्रसिद्ध वेब सिरीज ‘आश्रम’ मध्ये बॉबी देओल बाबा निरालाच्या मुख्य भूमिकेमध्ये आहे. लोकांना त्याच्या अभिनयाचा विश्वास बसला आहे. इतर दोन सिझनप्रमाणे आश्रमचा तिसरा सिझनही सुपरहिट ठरला. ‘आश्रम ४’ वेब सिरीजमध्ये ‘आश्रम ४’ ची झलक दाखवण्यात आली आहे. यावरून ‘आश्रम ४’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल असा अंदाज लावला जात आहे. पण तुम्हाला माहित आहे का की बॉबी देओलने ‘आश्रम ४’ बाबत प्रकाश झा यांच्यासमोर मोठी अट ठेवली आहे.
प्रकाश झा यांनी एक मोठा खुलासा केला आहे. प्रकाश झा यांना बॉलीवूडलाईफशी बोलताना ‘आश्रम ४’ बद्दल विचारण्यात आले. तेव्हा मजेशीर उत्तर देत ते म्हणाले, ‘बाबा जाने मन की बात’. यानंतर बॉबी देओल म्हणाला, ‘मला सीझन बनवायचे आहे आणि बनवत राहायचे आहे.’ तेव्हा प्रकाश झा म्हणाले की, चौथ्या सीझनबद्दल आधी तिसर्या सीझनमध्ये किती वाढ झाली हे पाहावे लागेल.
https://www.instagram.com/p/CeJJS7-PCRB/
‘आश्रम ३’ ने मोठा विक्रम केला आहे. ही मालिका ओटीटीवर सर्वात जास्त पाहिली जाणारी वेब सीरीज बनली आहे. नुकताच ‘आश्रम ४’ चा टीझरही रिलीज झाला आहे. ‘आश्रम ४’मध्ये बॉबी देओल, चंदन रॉय, अदिती आणि त्रिधा चौधरी पुन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

