Share

३७ वर्षांपूर्वी बक्षीस म्हणून मिळालेल्या ‘कार’ला पाहून रवी शास्त्री झाले भावूक; सांगितल्या ‘या’ ३ आठवणी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटर आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहिलेले रवी शास्त्री यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी त्यांच्या ३७ वर्षीय ऑडी कारचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. रवी शास्त्री यांना ही ऑडी-१०० कार १९८५ मध्ये बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील मालिकेत सर्वोत्तम खेळाडू ठरल्याबद्दल बक्षीस म्हणून मिळाली होती. ही कार ३७ वर्षांपूर्वीच्या जुन्या लूकमध्ये पाहून शास्त्री भावूक झाले. त्यांनी या कारचे फोटो चाहत्यांसाठी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहेत. उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्या सुपर कार क्लब गॅरेजने या कारला पुन्हा जुना लूक दिला आहे. त्यांनी स्वत: शास्त्रींना ऑडी-१०० कार सुपूर्द केली. कारला तिच्या जुन्या रूपात परत आणण्यासाठी सुमारे ८ महिने लागले आहेत. या कारचा फोटो ट्विटरवर शेअर करत रवी शास्त्री यांनी लिहिले की, ‘हा क्षण पाहून जुने दिवस ताजे झाले आहेत. ही देशाची संपत्ती आहे. सर्व काही पहिल्या दिवसासारखे दिसते आहे. मी ऑडी कार चालवली आणि आता पुन्हा पूर्वीसारखीच दिसणे माझ्यासाठी खास आहे.”

भारताने सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली १९८५ मध्ये बेन्सन अँड हेजेस कप जिंकला होता. यामध्ये मेलबर्नमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला होता. रवी शास्त्री यांनी अंतिम सामन्यात १ गडी बाद केला आणि नाबाद ६३ धावांची खेळी केली होती. त्याने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करत १८२ धावा केल्या आणि ८ बळी मिळवले होते. या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून गौरवण्यात आले आणि त्याला बक्षीस म्हणून ऑडी-१०० ही कार देण्यात आली होती.

ही कार दुरूस्त केल्यानंतर रवी शास्त्री यांनी इंडियन एक्स्प्रेससाठी लिहिलेल्या लेखात तिच्याशी संबंधित तीन रंजक किस्से सांगितले आहेत.

रवी शास्त्री यांनी जावेद मियांदाद सोबतचा किस्सा सांगितला
रवी शास्त्री यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखात सांगितले की, फायनलदरम्यान जावेद मियांदादसोबत त्यांची कशी गोड झुंज झाली. शास्त्री यांनी लिहिले की, “भारताला सामन्यात विजयासाठी आणखी १५-२० धावांची गरज होती आणि त्यावेळी मी फलंदाजी करत होतो. मग मियाँदाद मला म्हणाला कि तू पुन्हा पुन्हा गाडीकडे का पाहत आहेस? ती तुला भेटणार नाहीये. त्याचवेळी मी पहिल्यांदा कारकडे काळजीपूर्वक पाहिले आणि मग मियांदादला म्हणालो, काळजी करू नका ही कार माझ्या जवळ येत आहे आणि त्यानंतर जे घडले ते इतिहास आहे.

बंदरावर कार पाहण्यासाठी १० हजार लोक
शास्त्रींना बक्षीस मिळालेली ऑडी-१०० कार भारतात आणणे आव्हानापेक्षा कमी नव्हते. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ही कार भारतात आणण्यासाठी कर माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. शास्त्री म्हणाले, “गाडी पाहण्यासाठी गोदीबाहेर ८ ते १० हजार लोक उपस्थित होते. मी गाडी चालवायला नकार दिला. कारण एवढी गर्दी पाहून ही गाडी लोकांमध्ये शिरू नये अशी भीती वाटत होती. तोपर्यंत मी ऑडी नीट चालवायलाही शिकलो नव्हतो. अश्यात ऑडीसाठी एक ड्रायव्हर सापडला. ज्याने कार सुरक्षितपणे माझ्या घरापर्यंत नेली आणि त्यात एकही आडथळा आला नव्हता.

मुलीसोबत या कार राइडचाही किस्सा सांगितला
रवी शास्त्रींनी या कारशी संबंधित तिसरी मजेशीर गोष्ट सांगितली ती त्यांच्या मुलीशी संबंधित आहे. रवी म्हणाले, “याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माझ्या मुलीने तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कार पाहिली. त्यात ती पहिल्यांदाच बसली होती. येत्या काळात मी माझ्या मुलीसोबत पुन्हा ही कार चालवणार आहे. माझ्यासाठी ते आयुष्याचे एक चक्र पूर्ण करण्यासारखे असेल.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!