Share

कोण संजय राऊत? ते फार मोठे नेते आहेत का? ; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला

Published On: 

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३ मे हा शेवटचा दिवस होता. काल शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार होते. मात्र, कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे याचा कोणत्या पक्षाला फायदा होतो आणि कुणाला धक्का बसतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १० जून २०२२ रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यावरून शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपावर आरोप केला होता.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी ज्यांचं मतदान महत्त्वाचं ठरणार आहे, अशा अपक्ष आमदारांवर भाजपाकडून ईडी-सीबीआयच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याचे संजय राऊत म्हणाले होते. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दात निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कोण संजय राऊत? कोण आहेत ते?, कोणी फार तत्व नेते आहेत का?, फार मोठे नेते आहेत का?. ते दिवसभर काहीही बोलत असतात. त्यांना थोडी आम्ही उत्तर देणार आहोत.”

भाजपने आमदार फोडण्याचे काम सुरू केले-

राज्यसभेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपकडून विजयाचे दावे – प्रतिदावे सुरु झाले असल्याचे पाहायला मिळत आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपने आमदार फोडण्याचे काम सुरू केले आहे, असा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी भाजपवर आणि बहुजन विकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

“कोणते अपक्ष आमदार कुणाच्या बाजूने आहेत, हे निवडणुकीच्या दिवशी कळेल. कोण कुणाबरोबर आहे, हे १० तारखेला कळेल. बहुजन विकास आघाडी, एमआयएम कुठे आहे, बच्चू कडू कुठे आहेत, शेतकरी संघटना कुठे आहेत हे १० जूनला कळेल”, असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.

राष्ट्रवादीला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणावा लागेल-

सहावा उमदेवार शिवसेनेचा आणि भाजपचा देखील आहे. भाजपचे सहावे उमेदवार हे राष्ट्रवादीचे यापूर्वीचे खासदार होते. साखर कारखानदारी आणि सहकाराचा त्यांना अभ्यास आहे. त्यामुळे भाजपचा राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातील गडाला भगदाड पाडण्यासाठी कसोटीने प्रयत्न चालू आहेत.

“राष्ट्रवादीला स्वत:चा गड राखण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार संजय पवार यांना निवडून आणावा लागेल. तो उमेदवार निवडून न आल्यास भाजपने राष्ट्रवादीच्या गडात प्रवेश केला असे म्हटले जाईल. राष्ट्रवादीला पूर्णपणे आव्हान देणे भाजपला सोपे जाईल, केंद्राच्या हातात इथेनॉलचे लायसन्स आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या साखर कारखानदारांना इथेनॉलचं लालूच दाखवून ते त्यांना भाजपाकडे घेतील आणि राष्ट्रवादीला खिंडार पडू शकते”, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!