मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना १७ जूनला (शुक्रवार) खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. भारताच्या दृष्टिकोनातून हा सामना ‘करो या मरो’ अशा स्थितीचा आहे. भारतीय संघाला मालिकेत टिकायचे असेल तर हा सामना जिंकावा लागेल. सध्या मालिकेत भारतीय संघ १-२ ने पिछाडीवर आहे.
चौथ्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये जबरदस्त स्पर्धा होणार आहे. कारण या सामन्यात एकीकडे भारत मालिकेत जिवंत राहण्यासाठी आणि बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न करेल. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ सामना जिंकून मालिका खिशात करण्यासाठी मैदानात उतरेल. त्यामुळे या चौथ्या सामन्यावर क्रिकेटच्या त्यांचे लक्ष लागलेले आहे. पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर तिसऱ्या भारताने विजय मिळवत मालिकेत पुनरागमन केले. चौथ्या सामन्यासाठी या दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
Preps done ✅
All set for the 4⃣th @Paytm #INDvSA T20I at Rajkot. ???? ????#TeamIndia pic.twitter.com/ZvLAi1qnU3
— BCCI (@BCCI) June 17, 2022
भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. काही भारतीय फलंदाज वगळता बाकीचे खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर झुंजताना दिसले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सुरुवातीला २-० अशी आघाडी घेता आली. पाहुण्या संघाने पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा ७ गडी राखून पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी भारतीय संघाचा ४ गडी राखून पराभव केला होता.
भारतीय संघाचे मालिकेत पुनरागमन
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मालिकेतील तिसरा सामना १४ जूनला विशाखापट्टणम येथे खेळला गेला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ गडी गमावून १७९ धावा केल्या होत्या. विजयासाठी १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ १९.१ षटकांत १३१ धावा करून सर्वबाद झाला. सामन्यात भारताकडून युजवेंद्र चहलने ३ बळी तर हर्षल पटेलने ४ बळी घेतले होते. भारताने या सामन्यात ४८ धावांनी विजय मिळवला होता. त्याचबरोबर चौथ्या सामन्यातही पुन्हा एकदा संघ चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत – ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिका – टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, ड्वेन प्रिटोरियस, रासी व्हॅन डर ड्यूसेन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, वेन पारनेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, एनरिक नॉर्किया, तबरेझ शम्सी.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

