Share

“राष्ट्रपती पदासाठी बौद्धिक पातळी लागते”;  गुणरत्न सदावर्तेंचा शरद पवारांवर टीका

Published On: 

अकोला : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकी संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठक १५ जून रोजी पार पडणार आहे. अशातच आता राष्ट्रपतीपदावर कोणता उमेदवार असावा यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बैठका सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार देशाचे राष्ट्रपती व्हावे अशी चर्चा जोर धरू लागली आहे. यावरून गुणरत्न सदावर्तेंनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीवरून गुणरत्न सदावर्तेंनी शरद पवारांवर निशाणा साधला. ‘राष्ट्रपती पदासाठी उंची व बौद्धिक पातळी लागते”, असं म्हणत पवारांना खोचक टोला लगावला आहे. मात्र राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांनी यापूर्वीच नकार दर्शवला आहे. आपल्याला राष्ट्रपती होण्यास स्वारस्य नसल्याचे पवारांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. “मी अजून राजकारणात सक्रिय आहे.” असं सांगत पवारांनी राष्ट्रपतीपदाची ऑफर नाकारल्याचे समजत आहे.

पवारांवर राष्ट्रपती पदावरून भाजपकडून टीका –

भाजपचे खासदार दिलीप घोष यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पवारांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे वादग्रस्त विधान केल होते. आता पुन्हा एकदा त्यांनी पवारांबाबत वादग्रस्त विधान केले. “पवारांसारखे राष्ट्रपती आपल्या देशाला मिळाल्यास दहशतवाद वाढेल,” असे घोष म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!