Share

IND vs SA 2022 : कटकमध्ये सामन्याच्या तिकिटांवरून महिलांमध्ये हाणामारी; पाहा VIDEO!

Published On: 

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा संघ ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आहे. या मालिकेतील दुसरा सामना १२ जून रोजी कटक येथील बाराबती स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी तिकीट विक्रीवरून बराच गदारोळ झाला आसल्याच सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तिकीट खरेदीसाठी रांगेत उभ्या असलेल्या महिला एकमेकांना भिडल्या. अशा स्थितीत स्टेडियमबाहेर गोंधळाचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी या परिस्थितीची सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार,

काही महिला रांगेतून बाहेर आल्या होत्या. यावरून वादाला तोंड फुटले. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही महिला आपापसात भांडताना व हाणामारी करताना दिसत आहेत. यानंतर पोलिसांनी येऊन प्रकरण शांत केले. बाराबती स्टेडियमवर २०१९ नंतर पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे.

दक्षिण आफ्रिका मालिकेत १-० आघाडीवर

पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारताला पहिल्या सामन्यात ७ गडी राखून धूळ चारली. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ गडी गमावून २११ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने ५ चेंडू शिल्लक असताना ७ गडी राखून २१२ धावा करत सामना खिशात घातला. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने ६४ आणि रेसी वान डर डूसेनने नाबाद ७५ धावांची खेळी केली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी नाबाद १३१ धावांची विजयी भागीदारी रचली आणि संघाला विजय मिळवून दिला.

भारताने इतिहास रचण्याची संधी गमावली

भारताने आतापर्यंत खेळल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग १२ सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारताला कालचा १३ वा सामना जिंकून इतिहास रचण्याची संधी होती. भारत आणि सामना जिंकला असता तर तो सलग १३ सामने जिंकणारा एकमेव देश बनला असता. आता भारतीय संघाचे लक्ष्य कटक येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सामन्यावर असेल. भारत पहिल्या पराभवाला विसरून दुसऱ्या सामन्यात मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.

महत्वाच्या बातम्याया:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!