Share

IND vs SA 2022 : हेनरिक क्लासेनची ‘क्लास’ खेळी; दक्षिण आफ्रिकाचा ४ गडी राखून विजय

Published On: 

मुंबई : दक्षिण आफ्रिका संघ ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आहे. या मालिकेतील दुसरा सामना कटक येथील बाराबती स्टेडियम वर खेळला गेला. सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर ४ गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेन याने दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. सामन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बवूमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

दक्षिण आफ्रिकाचा डाव

भारताने प्रथम फलंदाजी करताना दिलेल्या १४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकाची सुरुवात खराब झाली. सलामीला आलेला रीझा हेंड्रीक्स ४ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ ड्वेन प्रिटोरियस (४) आणि मागील सामन्यातील हिरो वान डर डूसेन (१) बाद झाले. यानंतर कर्णधार तेंबा बावूमा आणि यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेन या दोघांनी दक्षिण आफ्रिकाचा डाव सावरला. बवूमाने संथ खेळी करत ३० चेंडूत ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. यामध्ये त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. क्लासेनने दमदार खेळी करत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ४६ चेंडूत ८१ धावांची खेळी खेळली. शेवटी डेव्हिड मिलरनेही १५ चेंडूत २० धावा करत संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ४ गडी बाद केले.

भारताचा डाव

ऋतुराज गायकवाडला पुन्हा एकदा चांगली सुरुवात देता आली नाही. अवघ्या एका धावेवर तो कगिसो रबाडाचा बळी ठरला. त्यानंतर इशान किशनने ३४ धावांची खेळी करत संघाला सावरले. त्याने २ चौकार आणि ३ षटकार ठोकले. एननिक नॉर्कियाने किशनला बाद केले. मधल्या फळीत कप्तान ऋषभ पंत (५), हार्दिक पंड्या (९), अक्षर पटेल (१०) स्वस्तात बाद झाल्यामुळे भारताची धावगती मंदावली. २ चौकार आणि २ षटकारांसह ४० धावांची खेळी करणारा श्रेयस अय्यर १४व्या षटकात बाद झाला. दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकात थोड्या धावा जोडता आल्यामुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. भारताने २० षटकात ६ बाद १४८ धावा केल्या. दिनेश कार्तिकने २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३० धावा केल्या. आफ्रिकेकडून नॉर्कियाने सर्वाधिक २ बळी घेतले.

५ सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-२० सामना जिंकत दक्षिण आफ्रिकाने ०-२ अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात भारताने दिलेल्या २१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत दक्षिण आफ्रिकेने दणदणीत विजय मिळवला होता. तर रविवारी खेळलेल्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला १४८ धावांतच रोखले आणि प्रत्युत्तरात ४ गडी राखून भारतावर विजय मिळवला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना १४ जूनला विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!