मुंबई : पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा शेवटचा सामना खेळला जात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. निकोलस पूरनने रविवारच्या सामन्याअगोदर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ ३ चेंडू टाकले होते. म्हणजेच त्याला पूर्ण षटक टाकण्याची एकदाही संधी मिळाली नव्हती. पुरनने मालिकेतील तिसर्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात (PAK vs WI) कर्णधार झाल्यानंतर स्वत: चेंडू घेऊन गोलंदाजी केली. त्याने त्याच्या गोलंदाजीने पाकिस्तानच्या ४ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पहिल्यांदाच गडी बाद केले. पुरनने मोहम्मद रिझवान, फखर जमान आणि इमाम-उल-हक या मोठ्या खेळाडूंना बाद केले. इमामने सलग ७ व्या डावात ५० हून अधिक धावांची खेळी खेळली. वृत्त लिहिपर्यंत पाकिस्तानने ३३ षटकात ५ गडी गमावत १५५ धावा केल्या आहेत. शादाब खान २२ आणि खुशदिल शाह १२ धावा करत खेळत आहे. पाकिस्तानने अगोदरच पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंकली आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या डावाची सुरुवात चांगली झाली होती. फखर जमान आणि इमाम-उल-हक यांनी पहिल्या विकेटसाठी १६.४ षटकांत ८५ धावा जोडल्या होत्या. फखरने याअगोदर एकदिवसीय क्रिकेटमध्येही द्विशतक झळकावले आहे. त्याला निकोलस पूरनने त्रिफळाचित केले. फखरने ४८ चेंडूत ३५ धावा केल्या. यामध्ये ४ चौकार मारले होते. यानंतर कर्णधार बाबर आझम एक धाव घेत हेडन वॉल्शचा बळी ठरला. यापूर्वी, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सलग ९ डावांमध्ये ५० हून अधिक धावा केल्या होत्या.
Imam-ul-Haq's scores this series:
65, 72, 62He is dismissed after another stellar contribution ????#PAKvWI | #KhelAbhiBaqiHai pic.twitter.com/XxwLdDyzxs
— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 12, 2022
पाकिस्तानने २९ धावांत ४ गडी गमावले
एका वेळी पाकिस्तानची धावसंख्या १ गडी गमावून ८८ होती त्यानंतर ११७ धावसंख्यावरच पाच गडी गमावले. म्हणजेच २९ धावांत संघाने ५ गडी गमावलले. इमाम-उल-हक ६८ चेंडूत ६२ धावा करून पूरनचा दुसरा बळी ठरला. त्याने ७ चौकार आणि १ षटकार लगावला. मोहम्मद रिझवान ११ आणि मोहम्मद हॅरिस शून्यावर बाद झाले. पूरनने १० षटकात ४८ धावा देत ४ बळी घेतले.
अलीकडेच कायरन पोलार्डच्या निवृत्तीनंतर २६ वर्षीय पूरनला वेस्ट इंडिजच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. याआधी त्याने एकूण क्रिकेटमध्ये एकच विकेट घेतली होती. त्याने ही विकेट प्रथम श्रेणीत क्रिकेटमध्ये घेतली होती. त्याने फर्स्ट क्लासमध्ये ६ आणि लिस्ट-ए मध्ये फक्त ३ चेंडू टाकले आहेत. त्याला अजून टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळालेली नाही.
First international wicket for West Indies skipper Nicholas Pooran ☝️
End of a fine opening stand ⚡#PAKvWI | #KhelAbhiBaqiHai pic.twitter.com/ltXA9PZ9eP
— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 12, 2022
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

