मुंबई : इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कसोटी कर्णधार जो रूटची बॅट सतत धुमाकूळ घालत आहे. न्यूझीलंडविरुद्ध (ENG vs NZ) खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात त्याने शतक झळकावले आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पहिल्या डावात ५५३ धावा केल्या होत्या. रुटच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने धावसंख्या ४०० धावांच्या पुढे नेली.
नॉटिंगहॅम कसोटीत न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डॅरेल मिशेलच्या १९० आणि टॉम ब्लंडेलच्या १०६ धावांच्या जोरावर संघाला ५५३ धावा करता आल्या. मोठ्या लक्ष्यासमोर पहिल्या डावात यजमानांची सुरुवात चांगली झाली नाही पण रूटने ऑली पोपसह संघाची धुरा सांभाळली. मालिकेतील दुसरे शतक झळकावताना पोप १४५ धावांवर बाद झाला.
Joe Root from 2012-20: 17 Hundreds & 49 fifties.
Joe Root from 2021-22: 10 Hundreds & 4 fifties. pic.twitter.com/8m32o3TebN— Johns. (@CricCrazyJohns) June 12, 2022
Joe Root is on a different level ✨ pic.twitter.com/PDwTsTrP59
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 12, 2022
इंग्लंडच्या माजी कर्णधाराने नॉटिंगहॅम कसोटीच्या पहिल्या डावात शतक झळकावून कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची बरोबरी केली. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील २७वे शतक होते आणि त्याने कसोटी शतकांच्या बाबतीत भारताचा कोहली आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथच्या बरोबरी साधली आहे.
२०२१ पासून रूट आश्चर्यकारक फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत गेल्या ४२ कसोटी डावांमध्ये १२ शतके झळकावली आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या काळात स्मिथ आणि विराट कोहली फार काही करू शकले नाहीत. कोहलीच्या बॅटने शतक ठोकून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. याआधी रुटने वेस्ट इंडिजविरुद्धही सलग दोन शतके झळकावली होती. त्याच वेळी, भारतीय संघ जेव्हा इंग्लंड दौऱ्यावर गेला होता, तेव्हा या मालिकेतही त्याने नॉटिंगहॅम आणि लॉर्ड्समध्ये सलग दोन शतके झळकावली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

