Share

IND vs SA : भारताचं दक्षिण आफ्रिकेला १४९ धावांचं लक्ष्य; ‘फिनिशर’ दिनेश कार्तिकची महत्त्वपूर्ण खेळी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात टी-२० मालिकेतील दुसरा सामना कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कप्तान टेम्बा बावुमाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत भारताला ६ बाद १४८ धावांपर्यंत रोखले. कगिसो रबाडा, वेन पार्नेल यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत भारताला जखडून ठेवले.

भारताचा डाव

ऋतुराज गायकवाडला पुन्हा एकदा चांगली सुरुवात देता आली नाही. अवघ्या एका धावेवर तो कगिसो रबाडाचा बळी ठरला. त्यानंतर इशान किशनने ३४ धावांची खेळी करत संघाला सावरले. त्याने २ चौकार आणि ३ षटकार ठोकले. एननिक नॉर्कियाने किशनला बाद केले. मधल्या फळीत कप्तान ऋषभ पंत (५), हार्दिक पंड्या (९), अक्षर पटेल (१०) स्वस्तात बाद झाल्यामुळे भारताची धावगती मंदावली. २ चौकार आणि २ षटकारांसह ४० धावांची खेळी करणारा श्रेयस अय्यर १४व्या षटकात बाद झाला. दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकात थोड्या धावा जोडता आल्यामुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. भारताने २० षटकात ६ बाद १४८ धावा केल्या. दिनेश कार्तिकने २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३० धावा केल्या. आफ्रिकेकडून नॉर्कियाने सर्वाधिक २ बळी घेतले.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युझवेंद्र चहल.

दक्षिण आफ्रिका – रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, हेनरीक क्लासेन (यष्टीरक्षक) डेव्हिड मिलर, वेल पार्नेल, ट्रिस्टन स्टब्स ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरीक नॉर्किया, तबरेझ शम्सी.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!