🕒 1 min read
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेत एकनाथ शिंदे गटातील बंडखोरीनंतर महाविकास आघाडी अल्पमतात आली असल्याचा दावा करत यावर राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासंदर्भातील पत्र पाठवले आहे. यावरच भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी टोला लगावला आहे.
“सत्तेच्या मोहापाई हिंदुत्व गेल, मंत्री गेले, आमदार गेले. लोकशाहीत बहुमत असाव लागत जे आज नाही, आता तरी मुख्यमंत्रीपदाचा मोह सोडून राजीनामा देत लोकभावनांचा आदर राखायला हवा.”, असे ट्वीट करत केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली आहे.
सत्तेचा मोहापाई
◾️हिंदुत्व गेल
◾️मंत्री गेले
◾️आमदार गेले
लोकशाहीत बहुमत असाव लागत जे आज नाही
आता तरी मुख्यमंत्रीपदाचा मोह सोडून राजीनामा देत लोकभावनांचा आदर राखायला हवा.— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 29, 2022
दरम्यान शिवसेनेने बहुमताच्या निर्णयाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. सदरील आदेशाच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आजच सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Maharashtra Crisis : बहुमत चाचणीच्या निर्णयाला ‘शिवसेने’चे सुप्रीम कोर्टात आव्हान
- Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची आस धरून बसले असतील तर…”, संजय राऊतांचा टोला
- Political Crisis : मोठी बातमी : ‘विधानसभेत बहुमत सिद्ध करा’, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- Sanjay Raut : ‘त्या’ डबक्यातून बाहेर पडा व महाराष्ट्राच्या स्वर्गात या; संजय राऊतांचे बंडखोरांना आवाहन
- Eknath Shinde : बहुमत चाचणीसाठी उद्या मुंबईत जाणार – एकनाथ शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
