Share

Special Session : विशेष अधिवेशन घेत असताना राज्यपालांनी ठाकरे सरकारला घातल्या ६ अटी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. या बंडामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिंदे गटात 49 आमदार आहेत. त्यामुळे राज्यात असलेलेल सध्याचे महाविकास आघाडी सरकार आल्पमतात आहे. काल रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान राज्यपालांनी 30 जून रोजी विशेष अधिवेशन बोलावले असून महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत राज्यपालांनी 30 तारखेला विशेष अधिवेशन बोलावले आहे. 30 तारखेला अधिवेशन सकाळी 11 वाजता सुरू होईल. ठाकरे सरकारला सायंकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओ शुटींग करण्यात येणार आहे. अधिवेशन सुरू झाल्यानंतर कोणताही विलंब होऊ नये आणि अधिवेशन स्थगित करू नये, असे आदेशही राज्यपालांनी दिले आहे. याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यात 6 अटी देखील घातल्या आहेत.

१. राज्याच्या विधान भवनाचं विशेष अधिवेशन उद्या गुरुवार ३० जून २०२२ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित केलं जावं. यात फक्त सरकारच्या बहुमत चाचणीची प्रक्रिया घेतली जावी. इतर कोणताही अजेंडा असू नये. तसेच बहुमत चाचणीची प्रक्रिया संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण करावी.

२. राज्यातील काही नेत्यांकडून करण्यात आलेल्या आक्रमक वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर विधान भवनाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात यावा. तसंच संपूर्ण प्रक्रियेवेळी कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल याची संपूर्ण काळजी घेतली जावी.

३. बहुमत चाचणीच्या प्रक्रियेचं लाइव्ह टेलिकास्ट केलं जावं आणि त्यासाठीची सर्व व्यवस्था उपलब्ध केली जावी.

४. मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी मतमोजणी शिरगणती पद्धतीने घ्यावी. यात प्रत्येक सदस्याला त्याच्या जागेवर उभं राहून त्याची गणती केली जावी आणि सदस्याच्या जागेवर जाऊन त्याची मोजणी केली जावी.

५. विशेष अधिवेशनाची संपूर्ण प्रक्रिया आणि बहुमत चाचणी उद्याच पूर्ण केली जावी. अधिवेशन कोणत्याही पद्धतीने स्थगित करता येणार नाही.

६. उद्याच्या संपूर्ण अधिवेशनाचं स्वतंत्र एजन्सीच्या माध्यमातून व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जावं याची जबाबदारी विधानसभेच्या सचिवांची राहील. याचे संपूर्ण फुटेज माझ्याकडे सुपूर्द करावे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!