मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकारणामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. राज्यातील सत्तानाट्याचा आजचा नववा दिवस आहे. शिवसैनिक आणि बंडखोर आमदारांची आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. अशातच शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विटर द्वारे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना सवाल केला आहे.
एकनाथ शिंदे गटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनी नाकारले आहे. या संदर्भात ट्विट च्या माध्यमातून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदे यांना खोचक सवाल केला आहे. “माननीय शिवसेना आमदार महोदय, हिंदुत्वाच्या मुद्यावरून युती झाली तर पुढची साडेसात वर्ष सत्तेची मग शिवसेनेला मुख्यमंत्री पद त्यात असणार का? बहुमतचाचणी करण्याआगोदर पक्षप्रमुखांशी बोलणार का? आदरणीय शिंदेसाहेब शिवसेना हरता कामा नये. शिवसैनिकांची मेहनत वाया जाऊ नये. जय महाराष्ट्र” अशा आशयाचं ट्विट दीपाली सय्यद यांनी केलं आहे.
जर शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप सोबत युती केली तर पुढची साडेसात वर्षे सत्तेची शिवसेनेला त्याच्यामध्ये मुख्यमंत्रीपद असणार का? आणि बहुमत चाचणी करणाऱ्या अगोदर पक्ष प्रमुखांशी बोलणार का? असा खोचक सवाल दीपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला विचारला आहे. “आदरणीय शिंदे साहेब शिवसेना हरता कामा नये. शिवसैनिकांची मेहनत वाया जाऊ नये” अशा प्रकारचा उपहासात्मक टोला दीपाली सय्यद यांनी यावेळी लगावला. शिवसेना खरंच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपसोबत युती करणार का? आणि जर युती झाली तर दिपाली सय्यद यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाप्रमाणे साडेसात वर्षाच्या सत्तेमध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रीपद असणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एकनाथ शिंदे गटातील बंडखोरीनंतर महाविकास आघाडी अल्पमतात आली आहे, असा दावा करत फडणवीस यांनी राज्यपालांचा हस्तक्षेप मागितला. तसेच आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती केली आहे. यानंतर शिवसेनेने याविरोधात थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. दरम्यान, सदरील आदेशाच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आजच सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :


