Share

IND vs ENG : भारताचा कॅप्टन लागला तयारीला..! इतिहास रचण्यासाठी रोहित गाळतोय घाम; पाहा PHOTO आणि VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया जुलैच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG) कसोटी क्रिकेट खेळणार आहे. भारताने यावर्षी मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता आणि आता जुलैमध्ये हंगामातील पहिला कसोटी सामना खेळला जाईल. भारत इंग्लंड दौऱ्यावर पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे, जो पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा भाग होता. उभय संघांमधली ही कसोटी गेल्या वर्षी खेळवली जाणार होती, मात्र कोरोनामुळे सामना पुढे ढकलण्यात आला होता.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आता या कसोटी सामन्याची तयारी सुरू केली आहे. आयपीएल २०२२ संपल्यानंतर रोहित प्रथमच मैदानात उतरला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर प्रशिक्षणासंदर्भात एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो मैदानात धावताना दिसत आहे. ३५ वर्षीय रोहितला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. ही मालिका ९ ते १९ जून दरम्यान खेळवली जाणार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलकडे टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर भारतीय संघ आयर्लंडसोबत दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे.

१ ते ५ जुलै दरम्यान होणारी इंग्लंड विरुद्धची पाचवी आणि शेवटची कसोटी खूप खास असणार आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत २-१ने आघाडीवर असून २००७ नंतर प्रथमच इंग्लंडच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याकडे लक्ष आहे. एकाच कसोटी सामन्यानंतर दोन्ही संघ ३ वनडे आणि तितक्याच टी-२० सामन्यांची मालिका खेळतील.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!