मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विन याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अश्विन भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर (IND vs ENG) जाऊ शकला नाही. टीम इंडिया १६ जूनला इंग्लंडला रवाना झाली होती. अश्विन सध्या क्वारंटाइनमध्ये आहे. भारतीय संघाने लीसेस्टरशायर काऊंटी ग्राउंडवर सरावही सुरू केला आहे, जिथे त्यांना २४ जूनपासून ४ दिवसांचा सराव सामना खेळायचा आहे. यानंतर टीम इंडिया १ जुलैपासून एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे.
पीटीआयनुसार, अश्विन कोरोना प्रोटोकॉलचे सर्व नियम पूर्ण केल्यानंतरच इंग्लंडला रवाना होईल. चेतेश्वर पुजारासह विराट कोहलीसह अनेक खेळाडू १६ जून रोजी इंग्लंडला रवाना झाले होते, तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एका दिवसानंतर इंग्लंडमध्ये टीम इंडियामध्ये सामील झाला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळल्यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर सोमवारी (२० जून) पहाटे यूकेला रवाना झाले.
India allrounder R Ashwin has tested positive for Covid-19, and as a result, not yet travelled to England for the upcoming Edgbaston Test#ENGvIND
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 21, 2022
अश्विन शुक्रवारपासून खेळल्या जाणाऱ्या लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याला मुकणार आहे. मात्र, तो पहिल्या कसोटीत निवडीसाठी उपलब्ध असेल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा कसोटी सामना पुढे ढकलण्यात आला होता. टीम इंडिया गेल्या वर्षी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली होती, त्यावेळी भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार होता, मात्र त्यानंतर मालिकेतील केवळ चार कसोटी सामने खेळले गेले. या मालिकेत टीम इंडिया २-१ने पुढे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

