मुंबई – राज्यसभा निवडणुकीत भाजपने १० मते अतिरिक्त मिळवली होती. आज भाजपाने विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election result)नवा विक्रम रचला आहे. विधान परिषदेच्या पहिल्या पसंतीची भाजपाला तब्बल १३३ मते मिळाली आहेत. भाजपा आणि अपक्षांच्या ११३ संख्याबळाच्या शिवाय भाजपाला मते ज्यादा मते मिळाली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ही जास्तीची २० मते महाविकास आघाडीकडून फोडली आहेत. भाजपाचे १०६ आमदार आहेत. आणि भाजपला ७ अपक्ष आमदारांचा पाठिंबा होता. म्हणजेच भाजपाचे ताकत ११३ होते, प्रत्यक्षात भाजपाला पहिल्या फेरीत १३३ मते मिळाली आहेत. यात विशेष बाब म्हणजे उमा खापरे यांचे एक मत बाद झाले, म्हणजे भाजपाकडे एकूण पहिल्या पसंतीची १३४ मते हती.
प्रवीण दरेकर- २९
राम शिंदे- ३०
श्रीकांत भारतीय – ३०
उमा खापरे – २७
प्रसाद लाड – १७
एकूण बेरीज केली तर ती १३३ मते आहेत.
राष्ट्रवादीकडे एकूण मते ५३ आहेत. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळालेला नव्हता, त्यामुळे ही संख्या ५१ वर आले होती. चार अतिरिक्त अपक्ष आमदारांचा पाठिंबा राष्ट्रवादीला होता, एकूण हा आकडा ५५ होता. एखनाथ खडसेंना २९आणि रामराजे निंबाळकरांना २८ मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीला एकूण ५७ मते मिळाली आहेत. रामराजेंच्या कोट्यातलं एक मत बाद झाले होते. म्हणजे एकूण ५८ मते राष्ट्रवादीला मिळाली आहेत, तीन मते ही जास्त आहेत, ही मते भाजपाच्या आमदारांनी दिल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.
काँग्रेसचे मते ४४ आहे, पहिल्या फेरीत चंद्रकांत हंडोरेंना २२ तर भाई जगताप यांना २० मते पडली आहेत. म्हणजेच काँग्रेसला केवळ ४२ मते पडली आहेत. म्हणजे काँग्रेसच्या पक्षाची पूर्ण मते काँग्रेसला पहिल्या फेरीत मिळाली नाहीत. दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीत भाई जगताप विजयी झाले आणि चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. काँग्रेसची दोन मते फुटली. तसेच शिवसेनेची मते जर खरंच काँग्रेसला गेली असल्यास, काँग्रेसची पाच मते फुटली असल्याची शक्यता आहे.
एमआयएमची दोन, सपाची दोन आणि बविआची तीन मते अशी सात मते भाजपाला गेली असल्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत एकूणच भाजपाने महाविकास आघाडीला चांगलाच धक्का दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

