🕒 1 min read
मुंबई : एकीकडे विधानपरिषदेच्या निकालाने शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसमधील (Congress) असंतोष समोर आला आहे. तर दुसरीकडे निवडणुकांपूर्वी पासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तसेच एकनाथ शिंदेच्या नाराजीमुळे महाविकासाघडीचं अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदे यांचा फोन नॉट रिचेबल येत असून त्यांच्या फोनवर कॉल केल्यानंतर गुजराती टोन ऐकू येत आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार फुटल्यास महाविकास आघाडीचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं. सध्या एकनाथ शिंदे गुजरातमधल्या सुरत इथल्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.
तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच १३ आमदार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार हे सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या हॉटेलबाहेरील बंदोबस्त वाढवला आहे. तसेच समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे आणि गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्यासोबत ही भेट झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागलीये.
दरम्यान, काल मध्यरात्री वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर शिवसेना आमदारांची आज पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे. आज दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच या बैठकीत किती आमदार उपस्थित राहतात यावर महाविकास आघाडीचं भविष्य अवलंबून असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
