मुंबई : राज्यसभेनंतर काल विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपाने (bjp) दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये बेबनाव असल्याचं स्पष्ट होत आहे. एकीकडे भाजपाकडे मतांचा कोटा नसताना देखील त्यांनी आपला ५ वा उमेदवार निवडून आणला. तर दुसरीकडे निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
या निकालाने शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसमधील (Congress) असंतोष देखील समोर आला आहे. त्यातच एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून, ते नाराज असल्याची माहिती समोर आलीये. एकनाथ शिंदे यांचा फोन नॉट रिचेबल येत असून त्यांच्या फोनवर कॉल केल्यानंतर गुजराती टोन ऐकू येत आहे. एकनाथ शिंदे गुजरातमधल्या सुरत इथल्या ला मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.
तसेच एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार फुटल्यास महाविकास आघाडीचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं. दरम्यान, या निकालाने चेक मिळालेल्या उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदारांची तातडीने बैठक बोलावली आहे. दुपारी ही बैठक होणार असून, या बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

