🕒 1 min read
मुंबई : राज्यसभेनंतर आज महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीत२८५ आमदारांनी मतदान केले आहे. तसेच निवडणुकीसाठी भाजपने ५ तर महाविकास आघाडीने ६ उमेदवार उभे केले होते. यामध्ये जागा १० आणि उमेदवार ११ असल्याने १० व्या जागेसाठी थेट भाजप नेते प्रसाद लाड आणि काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यात चुरशीची लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि राम शिंदे यांचं राज्याच्या राजकारणात पुनरागमन झालं आहे. हे दोन्ही नेते विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्याचप्रमाणे भाजपचे उमा खापरे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय तर राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर हे विजय झाले आहेत.
विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या पहिल्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची ३५ तर दुसऱ्या उमेदवाराला २९ मतं दिली, असे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेकडे एकूण ५५ मते होती. दोन्ही उमदेवारांना मतदान केल्यानंतर शिवसेना हक्काची तीन मते अतिरिक्त होती. शिवसेनेकडे बच्चू कडू यांच्या प्रहारचे दोन आमदार, शंकरराव गडाख, आशिष जैस्वाल, गीता जैन, चंद्रकांत पाटील अशी काही अतिरिक्त मते होती.
सचिनअहिर – 26 मते
आमशा पाडवी – 26 मते
चंद्रकांत हंडोरे – २२ मते
रामराजे नाईक निंबाळकर – २८ मते
एकनाथ खडसे – २९ मते
प्रवीण दरेकर – २९ मते
राम शिंदे – ३० मते
श्रीकांत भारतीय – ३० मते
उमा खापरे – २७ मते
प्रसाद लाड – १७ मते
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
