🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने रविवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी केली. त्याने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यानंतर हार्दिक म्हणाला की, बुमराहच्या अनुपस्थितीत चांगली कामगिरी करायची होती. त्याप्रमाणे सामन्यात गोलंदाजी केली. पाठीच्या दुखण्यामुळे बुमराह मालिकेतील निर्णायक सामना खेळू शकला नाही. हार्दिकने सांगितले की, गोलंदाजीत योगदान देता आल्याने आनंद होत आहे. मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिकने ७ मधून ३ षटकं निर्धाव टाकले आणि २४ धावांत ४ गडी बाद केले. ही कामगिरी त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी आहे. हार्दिकने जेसन रॉय, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जोस बटलर या स्टार फलंदाजांना बाद केले. त्यामुळे इंग्लंडचा संपूर्ण संघ ४५.५ षटकांत २५९ धावा करुन सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने हा सामना ५ गडी राखून जिंकला.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत हार्दिक पंड्याने बुमराहच्या अनुपस्थितीत अतिरिक्त जबाबदारीचा खुलासा केला. तो बोलताना म्हणाला की, “जसप्रीत हा सामना खेळणार नाही हे मला माहीत होतं. त्याने मला सांगितलंही होतं की तुला मधल्या षटकांमध्ये काही गोलंदाजी करावी लागेल. मला या सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावायची होती. मला मधल्या षटकांमध्ये यश मिळवण्यासाठी करायचे होते. मी ज्या प्रकारे योजना आखल्या होत्या त्याप्रमाणे जेव्हा माझ्यासोबत गोष्टी घडतात तेव्हा ते आत्मविश्वास देते.” असेही हार्दिक बोलताना म्हणाला.
हार्दिक पंड्याचा शानदार अष्टपैलू खेळ
हार्दिक पंड्याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली. त्याने आधी गोलंदाजीत इंग्लंडच्या ४ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर फलंदाजीत संकटसमयी संघासोबत उभा राहिला. यानंतर पंतसोबत शानदार भागीदारी करून भारतीय संघाचे सामन्यात पुनरागमन केले. त्याने अवघ्या ५५ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ७१ धावांची शानदार खेळी खेळली. ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी पाचव्या विकेटसाठी १३३ धावांची शानदार भागीदारी रचली. या दोघांमधील भागीदारीने भारताला सहज विजय मिळवून दिला. शेवटच्या सामन्यातील या विजयासह भारताने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.
आगामी काळात भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायचे आहेत. दरम्यान या मालिकेसाठी भारताच्या काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसह अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही या मालिकेत खेळणार नाही. विराट कोहली आशिया चषकाआगोदर क्रिकेटमधून एक महिना विश्रांती घेणार आहे. या काळात तो फॅमिलीसोबत लंडन शहरात राहणार असल्याचेही समोर आले आहे.
“I had to step up” – Hardik Pandya opens up on taking greater responsibility in Jasprit Bumrah’s absence https://t.co/eQAx9GjzrH #IPL #TATAIPL
— NOTO Sports (@noto_sports) July 18, 2022
महत्वाच्या बातम्या :
- Ramdas kadam : “शिवसेनाप्रमुख असते, तर माझ्यावर ही वेळ आली नसती आणि म्हणून… “; रामदास कदमांच गंभीर विधान
- IND vs ENG : “धोनी आणि रोहित शर्माची नेतृत्वशैली एकसमान”, भारताच्या माजी फिरकीपटूची प्रतिक्रीया
- Sanjay Raut | संजय राऊत हाजीर हो..! मुंबई न्यायालयाचे निर्देश
- Bus accident in Indore : गिरीश महाजन मध्य प्रदेशला रवाना; उपमुख्यमंत्र्यांची माहिती
- Eknath Shinde | मंत्रीमंडळ विस्ताराची सूत्र दिल्लीतून हलणार; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
