🕒 1 min read
मुंबई : मुंबईतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने सोमवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ६ ऑगस्टला हजर राहण्याचे निर्देश दिले. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीसंदर्भात राऊत यांना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राऊत या खटल्यात दोषी आहेत की नाही हे त्यांना न्यायालयात स्पष्ट करावे लागेल. त्यामनंतर दंडाधिकारी एकतर खटला पुढे ढकलतील किंवा त्यानुसार दंड ठोठावतील.
न्यायालयात हजर न राहिल्यामुळे दंडाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या विरुद्धचे जामीनपात्र वॉरंट १३ जुलै रोजी रद्द करून पुढील सुनावणी १८ जुलै रोजी म्हणजे आज ठेवली होती. यापूर्वी न्यायालयाने गेल्या महिन्यात राऊत यांच्या विरोधात समन्स जारी करून त्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान, मेधा सोमय्या यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम 70 अंतर्गत 5,000 रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
संजय राऊत यांनी आपली बदनामी करण्यासाठी बिनबुडाचे आरोप केल्याचा आरोप करत मेधा सोमय्या यांनी मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यांनी न्यायालयासमोर केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, “12 एप्रिल रोजी त्यांना शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये मीरा-भाईंदर महापालिकेतील ‘शौचालय घोटाळा’ प्रकरणी सोमय्या यांच्यावर आरोप करणारा लेख लिहला होता. हा लेख त्यांची प्रतिष्ठा खराब करण्याच्या उद्देशाने लिहिण्यात आला होता.”
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | मंत्रीमंडळ विस्ताराची सूत्र दिल्लीतून हलणार; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार
- Ramdas kadam : ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करतोय; रामदास कदमांनी व्यक्त केली खंत
- IND vs ENG : कॅप्टन रोहित शर्माचा भीमपराक्रम, ऋषभ पंतच्या नावावरही नव्या विक्रमाची नोंद
- Rohit Pawar : ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाची स्थगिती उठवा; रोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
- IND vs ENG : ऋषभ पंतने सामनावीर म्हणुन भेटलेले ‘हे’ खास बक्षीस दिलं रवी शास्त्रींना; पाहा VIDEO!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
